Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात घरातून डास पळवून लावण्याचे स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, झोपेचं होणार नाही खोबरं!

उन्हाळ्यात घरातून डास पळवून लावण्याचे स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, झोपेचं होणार नाही खोबरं!

Mosquitoes Prevention Remedies Is Summer : तुम्ही काही नॅचरल उपाय करून डासांना घरापासून दूर ठेवू शकता. या उपायांचे ना काही साइड इफेक्ट्स आहेत ना यासाठी तुम्हाला जास्त खर्च लागत. चला जाणून घेऊ काय आहेत हे सोपे उपाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:20 IST2025-02-19T12:19:31+5:302025-02-19T12:20:57+5:30

Mosquitoes Prevention Remedies Is Summer : तुम्ही काही नॅचरल उपाय करून डासांना घरापासून दूर ठेवू शकता. या उपायांचे ना काही साइड इफेक्ट्स आहेत ना यासाठी तुम्हाला जास्त खर्च लागत. चला जाणून घेऊ काय आहेत हे सोपे उपाय.

6 Natural Ingredients That Repel Mosquitoes | उन्हाळ्यात घरातून डास पळवून लावण्याचे स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, झोपेचं होणार नाही खोबरं!

उन्हाळ्यात घरातून डास पळवून लावण्याचे स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, झोपेचं होणार नाही खोबरं!

Mosquitoes Prevention Remedies Is Summer : सध्या थंडी आणि उन्हाचा लपाछुपीचा खेळ सुरू आहे. काही दिवसातच उन्हाचा पारा वाढेल आणि डास हैराण करायला सुरूवात करतील. उन्हाळ्यात डास जास्त चावतात, कारण हा काळ त्यांना प्रजननासाठी फायदेशीर असतो. अशात रात्री डासांमुळे झोपमोड होणं आलंच. सोबतच काही आजारांचा धोकाही वाढतो. अशात डास पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल लिक्वीड किंवा कॉइल्सचा वापर केला जातो. पण या प्रोडक्ट्समुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. सोबतच लहान मुलांवरही याचे दुष्परिणाम दिसतात. अशात तुम्ही काही नॅचरल उपाय करून डासांना घरापासून दूर ठेवू शकता. या उपायांचे ना काही साइड इफेक्ट्स आहेत ना यासाठी तुम्हाला जास्त खर्च लागत. चला जाणून घेऊ काय आहेत हे सोपे उपाय.

कापराचा धूर

उन्हाळ्यात जर डासांमुळे झोप अडथळा येऊ द्यायचा नसेल तर कापराचा धूर करणं हा सगळ्यात सोपा आणि फायदेशीर उपाय ठरतो. ४ ते ५ कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा आणि रूम काही वेळासाठी बंद करून घ्या. काही वेळानं रूमचा दरवाजा उघडा. डास रूमबाहेर पडताना दिसतील.

कडूलिंबाच्या पानांचा धूर

कडूलिंबाचा वापर आयुर्वेदात वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो. अनेक आजार दूर करण्यासोबतच डास पळवण्यासाठी देखील तुम्ही कडूलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी कडूबिंलाच्या हिरव्या पानांचा धूर करा. काही वेळातच डास घराबाहेर पडतील.

लिंबू आणि लवंग

डासांना लिंबाचा सुगंध आवडत नाही. त्यामुळे डासांनी हैराण झाले असाल किंवा झोपेचं खोबरं होत असेल तर झोपताना जवळ एक कापलेलं लिंबू ठेवा. त्यावर दोन तीन लवंग टोचून लावा. याने तुमच्याजवळ ना माश्या येतील ना डास येतील. 

लसणाची पेस्ट

लसणाचा गंध जरा उग्र असतो. त्यामुळे हा गंध डास सहन करू शकत नाहीत. लसूण ठेवलेल्या ठिकाणी डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.

पदीन्याचा रस

पदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचा वापर डास पळवण्यासाठीही केला जाऊ शकतो. पदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.

कडूलिंब, तेजपत्ता आणि लवंगाचा धूर

डास घरातून पळवून लावण्यासाठी कडूलिंबाची पाने, तेजपत्ता, काही लवंग आणि कापूर मिक्स करून त्याचा धूर करा. यानेही डासांपासून तुम्हाला सुटका मिळेल.
हे घरगुती उपाय काही दिवस केले तर डास तुमच्या घराच्या आसपासही येणार नाहीत. तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

Web Title: 6 Natural Ingredients That Repel Mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.