Join us  

भारतभर सर्वदूर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ६ अभिनेत्री, कशामुळे लाभली त्यांना देशभर लोकप्रियता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 3:39 PM

6 pan-India actresses who have set their mark across film Industries : पॅन इंडिया अभिनेत्री म्हणून सध्या ५ अभिनेत्रींची चर्चा आहे.

भारतीय लोकं जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या नावाचा डंका गाजवत आहे. प्रत्येक क्षेत्रात अव्वल कामगिरी करत आहे. मुख्य म्हणजे भारतीय चित्रपटांची चर्चा सातासमुद्रापार होत आहे. बरेचसे कलाकारही फक्त बॉलीवूडमध्ये नसून टॉलिवू़ड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा गाढत आहे. त्यातीलचं काही पॅन इंडिया (Pan India Actresses) अॅक्ट्रेसेसची चर्चा सोशल मीडियात होत आहे.

'बाहुबली' या चित्रपटानंतर सुपरस्टार प्रभासची ओळख पॅन इंडिया स्टार म्हणून झाली. त्यापासून पॅन इंडिया स्टार हा शब्द फार चर्चेत आला. दरम्यान, काही लोकांना पॅन इंडिया स्टार म्हणजे काय? पॅन इंडियाचा अर्थ काय? आपल्या भारतात सर्वात चर्चेत राहणारी पॅन इंडिया अॅक्ट्रेसेस कोणती? पाहूयात(6 pan-India actresses who have set their mark across film Industries).

पॅन इंडिया स्टार म्हणजे काय?

पॅन इंडिया स्टारचा अर्थ 'प्रेझेन्स अक्रॉस नेशन' असा आहे. सर्वप्रथम, प्रभास या सुपरस्टारला पॅन इंडिया स्टार म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर हा शब्द फारच प्रचलित झाला. सर्वप्रथम, पॅन इंडिया सिनेमा म्हणजे काय? हे पाहूयात. पॅन इंडिया सिनेमा म्हणजे असे चित्रपट जे विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाले. उदाहरणार्थ, 'बाहुबली' हा चित्रपट जगभरात ४ भाषांमध्ये प्रदर्शित झाला. तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळममध्ये या भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

२०२३ मध्ये जगभरातल्या तारुण्याला पडली ' रिज ' शब्दाची भुरळ, ' असे ' त्या शब्दात काय आहे की..

पॅन इंडिया स्टार म्हणजे एखादा असा स्टार, ज्याचे चित्रपट विविध भाषांमध्ये विविध देशांमध्ये प्रदर्शित झाले. त्या कलाकाराचा चित्रपट विविध भाषांमध्ये पाहिला जातो, आणि त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळतो. तेव्हा तो कलाकार पॅन इंडिया स्टार म्हणून प्रसिद्ध होतो. केवळ प्रभास, रजनीकांत आणि यश हे कलाकार नसून,     बरेच भारतीय अभिनेत्री आहेत, ज्यांची ओळख पॅन इंडिया अॅक्ट्रेस म्हणून आहे.

भारतातील टॉप ६ पॅन इंडिया अॅक्ट्रेसेस

रश्मिका मंदाना

साऊथ सिनेसृष्टीची श्रीवल्ली अर्थात रश्मिकाचा नुकताच 'अॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तिने याआधी तेलुगू, कन्नड आणि तामिळ या विविध भाषिक चित्रपटात लीड भूमिका साकरली.

समंथा

अनेकांची क्रश समंथाचे चित्रपट प्रेक्षकवर्ग आवर्जून पाहतात. ती लवकरच बॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून, तिच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आतुरता लागली आहे.

पूजा हेगडे

साऊथची अभिनेत्री पूजा हेगडेनी आतापर्यंत अनेक भाषिक चित्रपटात काम केलं. तिचे बॉलीवूडचे चित्रपट देखील तितकेच आवर्जुन पाहिले जातात.

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

रकुल प्रीत सिंग

पंजाबी कुडी रकुल प्रीत सिंग ही साऊथ अॅक्ट्रेस असून, तिने आजतागायत अनेक बॉलीवूड चित्रपटात काम करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय.

श्रुती हसन

कमाल हसनची मुलगी श्रुती देखील पॅन इंडिया स्टार आहे. तिने आतापर्यंत हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषांमध्ये काम केलंय.

कृती सेनन

कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवणारी कृती सेननने आतापर्यंत अनेक चित्रपटात कामा केलं. तिने आपल्या करिअरची सुरुवात नेनोक्कादीन या चित्रपटातून केली. हळूहळू तिने हिंदी इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया