Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, 6 सोप्या युक्त्या - कपडे फ्रेश, घरही प्रसन्न

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, 6 सोप्या युक्त्या - कपडे फ्रेश, घरही प्रसन्न

पावसाळ्यातील ओलसर कुंद वातावरणातही कपडे फ्रेश राहातील आणि आपला मूडही कपड्यांच्या कुबट (musty odour from clothes) वासानं खराब होणार नाही यासाठी सोपे (tricks for get rid of musty odour from clothes) उपाय आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 06:57 PM2022-07-06T18:57:24+5:302022-07-06T19:05:06+5:30

पावसाळ्यातील ओलसर कुंद वातावरणातही कपडे फ्रेश राहातील आणि आपला मूडही कपड्यांच्या कुबट (musty odour from clothes) वासानं खराब होणार नाही यासाठी सोपे (tricks for get rid of musty odour from clothes) उपाय आहेत.

6 simple tricks to get rid of musty odour from clothes in rainy season | पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, 6 सोप्या युक्त्या - कपडे फ्रेश, घरही प्रसन्न

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो, 6 सोप्या युक्त्या - कपडे फ्रेश, घरही प्रसन्न

Highlightsधुवायच्या कपड्यांचा ढीग करुन ठेवल्यानं कपड्यांना वास येतो. बेकिंग सोडा, व्हिनेगर यांचा उपयोग केल्यास कपड्यांना कुबट वास येत नाही. सूर्यप्रकाश नसला तरी कपडे सुकण्यासाठी हवेशीर जागा हवी. 

पावसाळा सुरु झाला की एक मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे कपडे सुकवायचे कसे. दोन दोन दिवस दोरीवर टाकूनही कपडे सुकत नाही. ओलसर कपडे घरात आणून घडी करुन ठेवले की कपड्यांना कुबट वास (musty odour from clothes)  येतो. असे कपडे अंगावर घातले की त्या वासानं आपलंही आणि आपल्या सोबतच्यांचही डोकं दुखायला लागतं. पावसाळ्यात कपडे सुकत नाही हे मान्य असले तरी त्यांना येणारा कुबट वास मात्र नकोसा होतो. हा वास घालवण्याचे उपाय शोधत असाल तर हा लेख तुमचं काम सोपं करेल. अगदी सोप्या उपायांनी (easy tricks to get rid of musty odour from clothes)  कपड्यांच्या कुबट वासाची समस्या दूर होते. एकदा खाली दिलेले उपाय करुन पाहाच ओलसर कुंद वातावरणातही कपडे फ्रेश राहातील आणि आपला मूडही  कपड्यांच्या कुबट वासानं खराब होणार नाही. 

Image: Google

कपड्यांचा कुबट वास घालवण्यासाठी...

1. अनेक घरात कपडे रोज धुण्यापेक्षा ते साचवून ठेवले जातात आणि मग मशीनमध्ये किंवा हातानं एकदम धुतले जातात. पण कपडे साठवून ठेवण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे कपड्यांना वास येतो जो कपडे धुतल्यानंतरही जात नाही. धुवायचे कपडे बादलीत/ टबमध्ये किंवा मशीनमध्ये साठवून ठेवले जातात. धुवायच्या कपड्यांना मोकळी हवा मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना वास येतो. कपड्यांना वास येवू नये म्हणून धुवायचे कपडे एकत्र साठवून न ठेवता ते वेगवेगळे ठेवावे. हॅंगरला लटकवून ठेवल्यास त्यांना हवा मिळते आणि कपड्यांना वासही येत नाही. 

2. कपड्यांचा कुबट वास घालवण्यासाठी लिंबाचा उपयोग करावा. लिंबामध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतत. लिंबू कुबट वास आणणाऱ्या बुरशीला तयार होवू देत नाही. कपड्यांना कुबट वास येवू नये म्हणून बादलीत पाणी घ्यावं. त्यात लिंबाचा रस घालावा. या पाण्यात कपडे भिजवावेत. 15-20 मिनिटानंतर कपडे धुवावेत. या उपायानं कपड्यांना कुबट वास येत नाही. 

3. स्वयंपाकात उपयोगी पडणारं व्हिनेगर स्वच्छतेच्या कामासाठीही उपयोगी पडतं. व्हिनेगरमध्येही आम्लधर्मीय गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळेच दुर्गंध निर्माण करणारे जिवाणू नष्ट होतात. कपड्यांना जिथे दुर्गंध येतो त्या ठिकाणी थोडं व्हिनेगर लावावं. थोड्या वेळानं कपडे नेहमीप्रमाणे धुतले की कपड्यांना कुबट वास येत नाही. 

Image: Google

4. बेकिंग सोड्याचा उपयोग करुन कपड्यांच्या कुबट वासाची समस्या दूर करता येते. बेकिंग सोड्यामुळे दुर्गंध निर्माण करणारे जिवाणू नष्ट होतात. एका बादलीत 1 मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा.  या पाण्यात कपडे भिजवून ठेवावे. नंतर कपडे पाण्यानं धुतल्यास कपड्यांना कुबट वास येत नाही. 

5. धुतलेले कपडे सुकवून घड्या करुन जिथे ठेवतो त्या ठिकाणी सिलिकाॅन पाऊच ठेवावे. यामुळे कपड्यांचा वास येत नाही. 

6. पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे कपडे सुकत नाही. पण सूर्युप्रकाश नसला तरी कपडे हवेशीर ठिकाणी सुकवावेत. हवा नसलेल्या ठिकाणी कपडे सुकण्यास घातल्यास कपडे दीर्घकाळ ओलसर राहून कपड्यांना कुबट वास येतो. हवा येईल अशा ठिकाणी कपडे सुकवावेत किंवा कपडे पंख्याखाली सुकवावेत.  
 

Web Title: 6 simple tricks to get rid of musty odour from clothes in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.