बाथरूम स्वच्छ तर तुमचं घरं स्वच्छ. घर नीट स्वच्छ पण बाथरूम घाण असेल तर, संपूर्ण घराची शोभा कमी होते. काहींच्या बाथरूममधून खूप दुर्गंधी येते. घर महिन्यातून साफ केलं तरी बाथरूम आठवड्यातून एकदा साफ करायला हवे. कारण बाथरूमचा वापर आपण दररोज करतो.
बाथरूम आठवड्यातून एकदा साफ न केल्यास, त्यातून दुर्गंधी व घाण घरात पसरू शकते. आपल्यापैकी बरेच जण बाथरूम स्वच्छ करण्यात तासंतास घालवतात, पण तरीही बाथरूम नीट साफ होत नाही. अनेकदा बाथरूममधील सामान नीट ठेवताना वेळ जातो. जर आपल्याला बाथरूम कमी वेळात झटपट साफ करायचे असेल तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या हॅकमुळे बाथरूम १० मिनिटात स्वच्छ साफ होईल(6 Super Easy Bathroom Cleaning Tips).
मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणे तातडीने थांबवा, म्हणून पाती होतात खराब
ड्रेन स्वच्छ करा
शॉवरनंतर केस अनेकदा ड्रेनमध्ये अडकते. त्यामुळे पाणी नीट जात नाही, ब्लॉक होते. अशावेळी नेहमी अंघोळ केल्यानंतर लगेच केस काढून टाका. यामुळे ब्लॉकेजची समस्या सुटेल. बाथरूमच्या ड्रेनजवळ एक लहान डस्टबिन ठेवा, ज्यामध्ये आपण केस, पॅकेटचे तुकडे इत्यादी टाकू शकतो.
वाफ पुसून टाका
बाथरूममध्ये काच असेल तर गरम पाण्याची वाफ त्यावर उठू शकते. पाण्याच्या शिंतोड्यांमुळे काच अधिक गलिच्छ दिसते. आंघोळ केल्यानंतर नेहमी लहान वायपरच्या मदतीने काच स्वच्छ करा. व टिश्यूच्या मदतीने काच पटकन पुसून टाका.
वर्षभरासाठी घेऊन ठेवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ४ उपाय, अळ्या-किड्यांचा त्रास बंद
टाईल्स स्वच्छ करा
टाइल्सच्या भेगांमध्ये अनेकदा काळपटपणा दिसून येतो. ते स्वच्छ करण्यासाठी, बेकिंग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि डिटर्जंट मिक्स करून पेस्ट तयार करा, व ही पेस्ट टाईल्सवर लावा. २० मिनिटानंतर स्क्रबने स्क्रब करा. पाण्याने धुतल्यानंतर, मायक्रोफायबर कापडाने टाईल्स स्वच्छ करा.
स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक
सामान रिअरेंज करा
अनेकांच्या बाथरूममध्ये शॅम्पू आणि कंडिशनरच्या बाटल्या पडलेल्या असतात. ज्यामुळे बाथरूम खराब दिसते. यासाठी सर्व प्रथम, आपल्या बाथरूममध्ये एक लहान कॅबिनेट ठेवा. त्यात आपल्या बाथरूमचे सर्व सामान ठेवा.
बाथरूममधून दुर्गंधी दूर करा
आर्द्रतेमुळे अनेक वेळा बाथरूममधून दुर्गंधी येऊ लागते. हा वास दूर करण्याचा उत्तम उपाय म्हणजे 4-5 कापूरच्या गोळ्या सिंकमध्ये ठेवणे. याशिवाय आपण या गोळ्या कॅबिनेटजवळही ठेवू शकता. आंघोळ झाल्यानंतर नेहमी बाथरूम काही वेळासाठी ओपन करून ठेवा. ज्यामुळे बाथरूममध्ये दुर्गंधी राहणार नाही.
बादल्या साफ करा
आंघोळ किंवा कपडे धुवून झाल्यानंतर नेहमी बादल्या स्वच्छ धुवून ठेवा. ज्यामुळे त्यांच्यावर पांढरे डाग दिसणार नाही. आठवड्यातून एकदा बाथरूम स्वच्छ करताना जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. या ट्रिक्समुळे बाथरूम सहज १० मिनिटात स्वच्छ होईल.