आपण नियमितपणे आंघोळ करण्यासाठी किंवा हात - पाय स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतो. सकाळच्या आंघोळीपासून ते कपडे धुण्यापर्यंत अनेक कामांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरत असतो. साबण वापरताना आपण त्याचा चांगला फेस येईपर्यंत साबणाचा वापर करतो. रोजच्या वापरातील हा साबण वापरुन वापरुन काही काळाने संपतो. रोज साबण वापरल्याने त्याचा आकार काही कालांतराने लहान लहान होत जातो. असा लहान साबणाचा तुकडा नंतर नीट हातातही पकडता येत नाही. तसेच त्याला हवा तसा फेसही येत नाही. अशावेळी आपण नवीन साबण वापरायला काढून त्याला हे जुन्या साबणाचे तुकडे चिटकवतो. काहीवेळा तर आपण चक्क हे साबणाचे लहान - लहान तुकडे फेकून देतो(How to Recycle Leftover Soap Pieces).
साबणाचे हे लहान तुकडे असेच फेकून दिल्याने वाया जातात. हा उरलेला साबण वाया जाऊ न देता घरातील इतर छोट्या - मोठ्या कामांसाठी आपण नक्कीच वापरु शकतो. या उरलेल्या लहानशा साबणाच्या तुकड्याचा (What can I do with Leftover Pieces of Soap?) आपण असाही वापर करु शकतो, हे कदाचित बऱ्याचजणांना माहित नसेल. या छोट्याशा साबणाच्या तुकड्याने आपल्या घरांतील अनेक कामे अतिशय सहजपणे (How to Use Leftover Soap Scraps) करता येऊ शकतात, (6 Little Uses for Your Left-over Soap Scraps)याची आपण कधी कल्पनाही केली नसेल. साबणाच्या तुकड्यांचा आपण घरातील बऱ्याच कामांसाठी उपयोग करुन घेऊ शकतो. त्यामुळे साबणाचा उरलेला तुकडाही वाया जात नाही. मग या साबणाचा नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात(6 Genius Things You Can Do With Leftover Soap Ends).
उरलेल्या साबणाचे तुकडे फेकून न देता त्यांचा असा करा वापर...
१. वॉर्डरोब किंवा कपाट सुगंधित ठेवा :- काहीवेळा आपल्या वॉर्डरोब किंवा कपाटांमधून कुबट किंवा विचित्र प्रकारचा वास येतो. तर काहीवेळा बदलत्या ऋतूंसह वॉर्डरोब किंवा कपाटामधून कुबट वास येणे खूप सामान्य आहे. हा वास नाहीसा करण्यासाठी उरलेल्या साबणाचे तुकडे एक कापडात किंवा मॅश बॅगमध्ये बांधून वॉर्डरोब किंवा कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवावे. आपण साबणांच्या तुकड्यांप्रमाणेच साबणाचे पॅकेजिंग कव्हर देखील उघडून ठेवू शकता. यामुळे आपल्या कपाटांत सुगंधी पसरेल व येणारा कुबट वास कायमचा निघून जाईल.
२. बुटांचा वास घालवण्यासाठी फायदेशीर :- आपल्या पायाला अनेकदा घाम येतो आणि आपल्या पायातील बुटांमध्ये हा घाम मुरल्याने त्या बुटांना एकप्रकारचा कुबट वास यायला लागतो. मात्र हा वास घालवण्यासाठी आपण या साबणाच्या तुकड्यांचा चांगला वापर करु शकतो. यासाठी हे साबणाचे तुकडे एका पातळ अशा सुती कापडात बांधायचे आणि हे कापड बुटांमध्ये ठेवून द्यायचे. रात्रभर साबण बुटांमध्ये राहीला तर सकाळी बुटांना येणारा वास गेलेला असतो.
किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...
३. अटकते दरवाजे करा दुरुस्त :- काहीवेळा लाकडाचे दरवाजे लाकूड खराब झाल्यामुळे व्यवस्थित उघड - बंद होत नाहीत. ड्रॉवरचे दरवाजे स्मूदली उघडण्यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूला स्टीलची स्टायलिंग पट्टी लावलेली असते. ही पट्टी जर खराब झाली तर दरवाज्याची नीट उघडझाप करता येत नाही. अशावेळी या स्टीलच्या पट्ट्यांवर थोडा साबण घासावा. या स्टीलच्या पट्ट्यांवर साबण घासल्यामुळे साबणांतील गुळगुळीतपणामुळे ड्रॉवरचे दरवाजे स्मूदली उघडण्यास मदत होते. अनेकदा पावसाळ्यांत लाकडी दरवाजे अडकतात नीट बंद होत नाहीत अशावेळी दरवाज्यांच्या बिजागरांवर व सांध्यांवर साबणाचा बार २ ते ३ वेळा घासून घ्यावा. यामुळे आपले दरवाजे, खिडक्या, ड्रॉवर व्यवस्थित उघड - बंद होण्यास मदत होते.
मातीची भांडी हौसेने वापरतो पण ती अस्वच्छ राहिली तर ? मातीची भांडी स्वच्छ करण्याच्या ५ टिप्स...
४. हँडवॉश तयार करण्यासाठी :- या साबणाच्या तुकड्यांपासून आपण हॅंडवॉश तयार करु शकतो. खराब झालेले हात धुण्यासाठी या साबणाच्या तुकड्यांपासून हँडवॉश तयार करु शकतो. साधारणपणे आपण हँडवॉश विकत आणतो. मात्र साबणाचे १० ते १२ तुकडे जमा झाल्यावर ते चांगले क्रश करायचे आणि त्यात पाणी टाकून हँडवॉश तयार करायचा. सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये आपल्या आवडीचे अरोमा ऑईल घालू शकतो. स्प्रे बॉटलमध्ये भरुन आपण हे मिश्रण हँडवॉश म्हणून वापर करतो.
वीज बिल जास्त येईल म्हणून रोज वॉशिंग मशीन लावत नाही ? ६ टिप्स, रोज मशीन लावूनही वीजबिल येईल कमी...
५. अडकलेल्या झिपसाठी फायदेशीर :- अनेकदा बॅग्स, जीन्स किंवा ड्रेसची झिप अचानक अडकली की कशी काढायची हा मोठा प्रश्न निर्माण होतो. या त्रासांतून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे छोटासा साबणाचा तुकडा. अडकलेल्या झिपवर हा साबणाचा छोटा तुकडा ३ ते ४ वेळा घासून घ्यावा. या उपायांमुळे बॅग्स, जीन्स किंवा ड्रेसची झिप गुळगुळीत होईल, परिणामी या झिप पटकन उघडल्या जातील.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
६. घट्ट झालेले किंवा गंजलेले कुलूप उघडण्यासाठी :- कुलूप जर गंज चढून घट्ट झाली असतील किंवा व्यवस्थित काम करत नसतील तर साबणाचा वापर करून ही कुलूप दुरुस्त करु शकता. कुलुपाच्या चावीला साबणांवर घासा. आता चावीचा साबणावर घासलेला भाग कुलुपाच्या आत घाला यामुळे घट्ट झालेले कुलूप लूज लूज होईल व व्यवस्थित काम करु लागेल.
कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...