Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यांत कपड्यांवर पडलेले बुरशीचे काळे- हिरवे-पिवळे डाग काढण्यासाठी ६ सोपे उपाय...

पावसाळ्यांत कपड्यांवर पडलेले बुरशीचे काळे- हिरवे-पिवळे डाग काढण्यासाठी ६ सोपे उपाय...

6 Easy, Natural Ways to Get Rid of Fungus from Your cloths in this Monsoon : पावसाळ्यात कपड्यांवर बुरशीचे डाग पडतात, काही केल्या ते डाग निघत नाहीत त्यासाठीच हे सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2023 02:28 PM2023-08-03T14:28:48+5:302023-08-03T14:47:35+5:30

6 Easy, Natural Ways to Get Rid of Fungus from Your cloths in this Monsoon : पावसाळ्यात कपड्यांवर बुरशीचे डाग पडतात, काही केल्या ते डाग निघत नाहीत त्यासाठीच हे सोपे उपाय

6 ways to prevent fungus from growing on your clothes in this monsoon. | पावसाळ्यांत कपड्यांवर पडलेले बुरशीचे काळे- हिरवे-पिवळे डाग काढण्यासाठी ६ सोपे उपाय...

पावसाळ्यांत कपड्यांवर पडलेले बुरशीचे काळे- हिरवे-पिवळे डाग काढण्यासाठी ६ सोपे उपाय...

पावसाळा आणि फंगस यांचे एक प्रकारचे अतूट नाते आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. सगळ्या ऋतूंपैकी या फंगसचा त्रास हा फक्त उन्हाळ्यातच जास्त जाणवतो. पावसाळ्यात ओलावा वातावरणातील आर्द्रता यामुळे फंगस येणे ही एक सामान्य समस्या आहे. पावसाळ्यात किचनमधील खायच्या - साठवणीच्या  वस्तूंपासून ते लाकडाची दार, खिडक्या, कपडे यांपासून सगळ्याच गोष्टींना बुरशी येते. पावसाळ्यात वारंवार येणाऱ्या या बुरशीला आळा घालण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. 

पावसाळ्यात अनेक समस्यांपैकी एक समस्या सगळ्यांच्याच बाबतीत अगदी कॉमन असते ती म्हणजे, पावसाळ्यात कपडे न वाळणे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात ओलावा कायम टिकून राहतो यामुळे वेळेवर कपडे न वाळण्याची समस्या सतावते. हे कपडे कित्येकदा तसेच ओले राहतात. या ओल्या राहिलेल्या कपड्यांमधून कुबट, घाणेरडी दुर्गंधी येऊ लागते. पावसाळ्यात व्यवस्थित न वाळलेल्या कपड्यांमधून दुर्गंधी तर येतेच सोबतच कपड्यांना बुरशी लागून त्या बुरशीचे डागही कपड्यांवर पडतात. हे बुरशीचे डाग कपडे कितीहीवेळा घासून धुवून स्वच्छ केले तरी जाता जात नाही. अशा परिस्थितीत, कपड्यांवर डाग पडले की हे कपडे फेकून द्यावे लागतात. यासाठीच पावसाळ्यात कपड्यांवर बुरशी येऊन त्याचे जर डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूयात(6 ways to prevent fungus from growing on your clothes in this monsoon).

पावसाळ्यात कपड्यांवरील बुरशीचे डाग सहज काढण्यासाठी उपाय.. 

१. लिंबू-मीठ वापरा :- पावसाळ्यात कपड्यांवरील बुरशीच्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी, एका बादलीत पाणी घेऊन त्यात एक किंवा दोन लिंबाचा रस आणि दोन ते तीन चमचे मीठ मिसळून द्रावण तयार करावे. नंतर या द्रावणात बुरशी आलेले कपडे टाकून काही वेळ ते तसेच राहू द्या आणि थोड्यावेळाने घासून डाग साफ करा. यानंतर कपडे रोज धुतो तसेच पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावेत. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

२. व्हाईट व्हिनेगर :- बुरशीचे डाग घालवण्यासाठी आपण व्हिनेगरचाही वापर करू शकता. यासाठी अर्धी बादली पाणी घ्या आणि त्यात एक कप व्हाईट व्हिनेगर मिसळा. यानंतर या मिश्रणात कपडे एक ते दोन तास भिजत ठेवा. नंतर कापड घासून स्वच्छ करा आणि शेवटी डिटर्जंटने कपडे धुवा. 

३. बेकिंग सोड्याने स्वच्छ करा :- कपड्यांवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त ठरू शकतो. यासाठी थोडासा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात काही थेंब पाणी टाकून जाडसर पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट कपड्यांवरील डागांवर लावा आणि वीस मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर,कपडे घासून स्वच्छ करा आणि वॉशिंग पावडरचा वापर करून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावेत. 

पावसाळ्यात पाण्यात भिजलेल्या चपला-बुटांना दुर्गंधी येते? ४ सोपे उपाय- कुबट वास येणार नाही...

४. बोरॅक्स पावडर :- बुरशीने घाणेरडे झालेले कपडे स्वच्छ करण्यासाठी आपण बोरॅक्स पावडरचीही मदत घेऊ शकता. यासाठी आपण डिटर्जंटच्या जागी बोरॅक्स पावडर देखील वापरू शकता. बोरॅक्स पावडर हे एक रसायन आहे जे बुरशीचे डाग काढून टाकण्यास मदत करते.

५. सिलिका जेल पाऊच कपाटात ठेवा :- पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांमध्ये बुरशी येऊ नये म्हणून आपण सिलिका जेल पाऊच कपाटांत ठेवू शकता. यासाठी आपण कपाटात ठेवलेल्या कपड्यांमध्ये सिलिका जेलची एक पिशवी ठेवू शकता. आतापर्यंत आपण हे सिलिका जेल पाऊच नवीन पर्स, शूज आणि चप्पल यासारख्या वस्तू खरेदी करता तेव्हा त्यांच्या बॉक्समध्ये पाहिले असतील. वास्तविक ते ओलावा शोषण्याचे काम करतात, यामुळे कपड्यांना बुरशी येत नाही. 

६. कडुलिंबाची पाने :- पावसाळ्यात बुरशी आणि बॅक्टेरियापासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण कडुलिंबाची पाने देखील वापरू शकता. यासाठी काही कडुलिंबाची पाने स्वच्छ करून उन्हात वाळवावीत. त्यानंतर कपाटात ठेवलेल्या कपड्यांमध्ये ही पाने ठेवा. यामुळे पावसाळ्यात कपड्यांचे बुरशी आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होते.

Web Title: 6 ways to prevent fungus from growing on your clothes in this monsoon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.