Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजरमध्ये तयार झालाय बर्फाचा भलामोठा डोंगर? ६ घरगुती टिप्स; वेळीच साफ करा अन्यथा..

फ्रिजरमध्ये तयार झालाय बर्फाचा भलामोठा डोंगर? ६ घरगुती टिप्स; वेळीच साफ करा अन्यथा..

6 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer : फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ जमा होत असेल तर; ६ गोष्टी करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 11:37 AM2024-03-13T11:37:06+5:302024-03-13T11:38:09+5:30

6 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer : फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ जमा होत असेल तर; ६ गोष्टी करून पाहा..

6 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer | फ्रिजरमध्ये तयार झालाय बर्फाचा भलामोठा डोंगर? ६ घरगुती टिप्स; वेळीच साफ करा अन्यथा..

फ्रिजरमध्ये तयार झालाय बर्फाचा भलामोठा डोंगर? ६ घरगुती टिप्स; वेळीच साफ करा अन्यथा..

रेफ्रिजरेटरचा (Refrigerator) वापर प्रत्येक घरात होतो. उन्हाळ्यात लोकांना याची खूप गरज भासते. भाज्या, फळे, दूध, दही, पाणी यासह इतर गोष्टी थंड आणि अधिक वेळ फ्रेश ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर होतो. शिवाय फ्रिजरमध्ये देखील आपण बऱ्याच गोष्टी ठेवतो. पण नकळत घडणारी चूक किंवा इतर कारणांमुळे फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होतो. फ्रिजरमध्ये पाणी जमा होऊ लागते. शिवाय दुर्गंधीही पसरू लागते (Kitchen Tips).

ओलाव्यामुळे फ्रिजरमध्ये तयार झालेला डोंगर घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण फ्रिज खराब होईल की काय? या भीतीने फ्रिजरमध्ये आपण काही करत नाही (Cleaning Tips). जर फ्रिजरमध्ये बर्फ जमा होऊ नये, शिवाय त्यातून दुर्गंधी येऊ नये असे वाटत असेल तर, काही टिप्स उपयुक्त ठरू शकतात(6 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer).

फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होऊ नये म्हणून..

- सिंगल डोअर रेफ्रिजरेटर असलेल्या लोकांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो. कितीही साफ करा, फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होतोच.

- ही समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा फ्रिजरचा दरवाजा वारंवार आपण उघडतो. दरवाजाचे गॅस्केट खराब होते. जेव्हा दरवाजाचे गॅस्केट खराब होते तेव्हा बाहेरची हवा आत येत राहते, आणि आर्द्रतेमुळे बर्फ तयार होतो.

घरात झुरळं सैरावैरा पळतात?? वापरून पाहा किचनमधल्या ४ गोष्टी; झुरळांचा होईल नायनाट

- पाणी शुद्ध करणारे वॉटर फिल्टर नीट काम करत नसेल तर, बर्फ जमा होतो. यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तू बर्फाने झाकली जाते. त्यामुळे पाण्याचे फिल्टर बदलणे हाच एक उपाय आहे.

- फ्रिजमध्ये एक ट्यूब असते जी खालून पाणी बाहेर काढते. ही नळी बंद पडल्यास, रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ जमा होऊ लागते. नलिका वारंवार स्वच्छ करत रहा. जर ट्यूबमध्ये काहीतरी अडकले असेल तर, ती घाण काढण्यासाठी आपण साबणयुक्त पाण्याचा वापर करू शकता.

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

- जर फ्रिजमध्ये जास्त बर्फ जमा होत असेल तर, फ्रिज योग्य तापमानावर सेट करणे गरजेचं आहे. फ्रिजरचे तापमान -१८ अंश सेल्सिअसवर सेट करणे आवश्यक आहे. यामुळे फ्रिजचे तापमान नियंत्रित आणि फ्रिज व्यवस्थित कार्य करते.

- फ्रिजच्या मागील बाजूस कॉइल कंडेन्सर असते. यामुळे फ्रिज थंड होते. ते घाण झाल्यावर फ्रिज नीट काम करू शकत नाही. ते साफ करत राहा.

Web Title: 6 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.