Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

How Can I Avoid Shoe Bites ? 7 Easy Tips To Avoid It : पावसाळयात आपण कितीही महागड्या किंवा ब्रँडेड चपला खरेदी केल्या तरी त्या थोड्या का होईना पायाला लागतातच, शु बाईट होऊ नये म्हणून काय करावे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 06:47 PM2023-07-10T18:47:51+5:302023-07-10T19:12:00+5:30

How Can I Avoid Shoe Bites ? 7 Easy Tips To Avoid It : पावसाळयात आपण कितीही महागड्या किंवा ब्रँडेड चपला खरेदी केल्या तरी त्या थोड्या का होईना पायाला लागतातच, शु बाईट होऊ नये म्हणून काय करावे ?

7 Easy Home Remedies And Other Useful Tips To Prevent Painful Shoe Bites In Rainy Season. | पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

पावसाळा म्हटलं की नवीन छत्री, रेनकोट, चपला यांची खरेदी आलीच. प्रत्येक पावसाळयात या गोष्टी नवीन घेणे याची मजा काही औरच असते. एकदा का पावसाळा संपला की आपण आपली छत्री, रेनकोट इतर काही गोष्टी माळ्यावर ठेवून देतो. असे छत्री, रेनकोट आपण थेट पुढच्याच वर्षीच काढतो. बरं वर्षभर माळ्यावर पॅकिंग करून ठेवलेले हे छत्री, रेनकोट व्यवस्थित वापरायच्या स्थितीत असले तर ठिक... नाहीतर परत नवीन घेणे आलेच. काहीवेळा आपण जरी छत्री, रेनकोट हे जुनेच वापरले तर हरकत नाही परंतु पावसाळी चपला या खरेदी कराव्याच लागतात. 

पावसाळयात आपण कितीही महागड्या किंवा ब्रँडेड चपला खरेदी केल्या तरी त्या थोड्या का होईना पायाला लागतातच. या नवीन चपला पायांच्या बोटांना व मागच्या बाजूला टाचेवर जास्त लागतात. अशा चपला लागून त्या जागी छोटी जखम किंवा फोड येऊ लागतात, यालाच आपण शु बाईट असे म्हणतो. या शु बाईट होऊ नये म्हणून आपण अनेक उपाय करून पाहतो. काहीवेळा तर या शु बाईट वेदना इतक्या होतात की आपल्यापैकी काहीजण या नव्या - कोऱ्या चपला चक्क फेकून देतात. यासाठीच यंदाच्या पावसाळ्यात नवीन घेतलेल्या चपलांचे शु बाईट होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो(7 Easy Home Remedies And Other Useful Tips To Prevent Painful Shoe Bites In Rainy Season).

पावसाळी चपला पायाला का लागतात ? 

पावसाळयात आपण शक्यतो नवीन चपला विकत घेतो. या नवीन चपलांमुळे बरेचदा आपल्या पायाला शु बाईट होतात. पावसाळयात जर आपण नवीन चप्पल विकत घेतलेली असेल आणि ही चप्पल प्लॅस्टिकची बनलेली असेल तर ती हमखास पायाला लागतेच. या प्लास्टिक चप्पलांच्या कडा जर व्यवस्थित मोल्ड केलेल्या नसतील तर या कडा आपल्याला पायाच्या मागच्या बाजूला टाचेवर लागून शु बाईट होते. या प्लास्टिक चपलांच्या कडा थोड्या धारदार असतात, त्याचे पायांच्या त्वचेशी घर्षण होऊन पायांवर छोट्या - छोट्या जखमा होतातच. अशातच जर आपण या जखमा घेऊन पावसाच्या पाण्यांत फिरत असलो तर या जखमा चिघळण्याची अधिक शक्यता असते. 

पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...

पावसाळी चपला लागून शु बाईट होऊ नये म्हणून काही सोपे उपाय... 

१. जखम उघडी ठेवू नका :- पावसाळी चपलांमुळे होणारे शु बाईट व छोट्या छोट्या जखमा कोरड्या होण्यासाठी उघड्या ठेवण्याचा सल्ला दिला जातो. परंतु  अशी चूक करु नये. पावसाळ्यात जर आपण ही जखम अशीच उघडी ठेवली तर वारंवार त्याला पावसाचे पाणी लागून ही जखम सतत ओलीच राहील. त्याचप्रमाणे पावसाच्या घाणेरड्या पाण्याचा या जखमेशी संपर्क आल्यास आपल्याला इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यांत राहून ही जखम अधिकच चिघळू शकते. यासाठी ही जखम सर्वप्रथम एका सुती कापडाने पुसून स्वच्छ व कोरडी करून घ्यावी. त्यानंतर या जखमेवर अँटी फंगल पावडर किंवा क्रिम लावावी. आपण आपल्या सोयीनुसार जखमेवर बँडेज लावू शकता. परंतु दर दोन दिवसाआड हे बँडेज बदलणे गरजेचे असते. 

२. चप्पल योग्य मापाची घ्यावी :- पावसाळी चप्पल विकत घेताना ती आपल्या पायांच्या अनुसार योग्य मापाची घ्यावी. चप्पल विकत घेताना आपल्या पायाचा पुढचा भाग, पायाची बोटे दुमडत नाहीत ना याचा विचार करून मगच चप्पल विकत घ्यावी. चप्पल विकत घेत असताना ती पायांत घालूंन थोडे अंतर चालून पाहावे. जर चप्पल पायाला लागत असेल तर घेऊन नये. चप्पल विकत घेताना ती थोडी लूज असलेलीच विकत घ्यावी, जेणेकरून आपले पाय त्यात व्यवस्थित फिट बसतील. 

३. फोड फोडू नका :- काहीवेळा शु बाईटमुळे आपल्या पायाच्या अंगठ्याला किंवा करंगळीला पाणीदार फोड येतात. हे फोड फोडायची काहींना सवय असते. परंतु असे करू नये. हे फोड फोडल्याने जखम आणखीनच चिघळू शकते. तसेच पायांना होणाऱ्या या जखमांना वारंवार हात लावू नये. 

४. बर्फाच्या तुकड्याने मसाज करावा :- पायांना शु बाईटची जखम झाली असल्यास, त्या जागेवर बर्फाचा खडा चोळून मसाज करावा. यामुळे आपल्याला आराम मिळेल. बर्फाचा तुकडा एका सुती कापडामध्ये गुंडाळून त्याने पायांना हलकेच मसाज करावा. तसेच शु बाईटमुळे जर आपल्या पायांना सूज आली असेल तर बराच शेक घेतल्याने आराम मिळू शकतो. 

पावसाळ्यात मॉर्निंग वॉकला जाता येतं नाही? ६ सोपे उपाय, घरातच राहून वजन होईल कमी...

५. टूथपेस्ट व पेट्रिलियम जेलीचा असा करा वापर :- शु बाईट झालेल्या ठिकाणी आपण थोडीशी टूथपेस्ट बोटावर घेऊन लावू शकता. टूथपेस्ट लावल्यानंतर थोड्यावेळासाठी ती टूथपेस्ट तशीच राहू द्यावी. मग पाय पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावेत. टूथपेस्ट सोबतच आपण पेट्रिलियम जेलीचा देखील वापर करू शकतो. 

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

६. बॉडी लोशन किंवा खोबरेल तेल :- चपलांमुळे पायाला शु बाईट होऊ नये म्हणून नवीन चप्पल विकत आणल्यानंतर थोडेसे बॉडी लोशन किंवा खोबरेल तेल या चपलांच्या कडांना लावून घ्यावे. यामुळे या कडा मऊ पडून पायांना लागत नाहीत. 

७. पॅंटी लायनरचा वापर :- पायांना शु बाईट होऊ नये म्हणून आपण बाजारांत मिळणाऱ्या पॅंटी लायनरचा देखील वापर करु शकतो. आपण पायांच्या टाचांना शु बाईट होऊ नये म्हणून याचा वापर करू शकतो. चपलांच्या मागील बाजूस आपण पॅंटी लायनर लावून पायांच्या टाचांना शु बाईट होण्यापासून वाचवू शकतो.

Web Title: 7 Easy Home Remedies And Other Useful Tips To Prevent Painful Shoe Bites In Rainy Season.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.