सध्या प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशीन (Washing Machine) आहे. ज्यात मेहनत न घेता कपडे लवकर धुतले जातात. शिवाय कपडे सुकवण्यातही मदत होते. पण अजूनही अनेकांना वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याची योग्य पद्धत ठाऊक नाही. चुकीच्या पद्धतीने कपडे धुतल्यास मशीन खराब होऊ शकते. अनेकदा कपड्यांवर डिटर्जेंटचे डाग तसेच राहतात. ज्यामुळे बऱ्याचदा कपडे पुन्हा बादलीत बुचकळून धुवावे लागतात (Washing Tips).
अशात कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना कोणती काळजी घेतली पाहिजे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याची योग्य पद्धत कोणती? पाहूयात(7 Washing Machine Tips That You Must Know).
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना लक्षात ठेवा ७ टिप्स
- कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुण्यापूर्वी त्याला २ विभागात विभाजित करा. एका बादलीत कमी घाणेरडे कपडे ठेवा, तर दुसऱ्या बादलीत हट्टी डाग लागलेले कपडे ठेवा, व दोन्ही प्रकारचे कपडे वेगवेगळे धुवा.
- वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना डिटर्जेंट आधी घालू नका. सर्वात आधी कपडे घाला, मग पाणी आणि शेवटी डिटर्जेंट घाला. सर्वात आधी डिटर्जेंट घातल्याने, त्याचे डाग कपड्यांवर तसेच राहतात.
- शर्ट धुताना शर्टची बटणं कधीही लावू नका. बटणं काढून धुवा. यामुळे बटणाची शिलाई लवकर उसवते.
मुलांची वाढेल उंची-शरीरही राहील सुदृढ, पाहा ३ प्रकारचे भन्नाट व्यायाम; उंची वाढवण्याचा सोपा मार्ग
- नवीन कपडे नेहमी वेगळे धुवा. कारण नवीन कपड्यांमधून बऱ्याचदा रंग निघतो. नवीन कपड्यांचा रंग बऱ्याचदा इतरही कपड्यांना लागतो. त्यामुळे नवीन कपडे नेहमी वेगळे धुवावे.
- कपडे सुकवण्यासाठी बरेच जण ड्रायरचा वापर करतात. पण ड्रायरच्या वापरामुळे कपड्यांची चमक कमी होते. त्यामुळे कपडे सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर न करता, खिडकीबाहेर किंवा बाल्कनीमध्ये वाळत घाला.
- वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी आपण थंड पाण्याचा वापर करतो. पण थंड पाण्याव्यक्तिरिक्त आपण कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता. कोमट पाण्यामुळे कपड्यांवरील डाग लवकर निघतात, शिवाय कपड्यांची चमक तशीच राहते.
कांदा चिरताना डोळ्यातून पाण्याच्या धारा? कांदा चिरताना ३ प्रकारच्या पाण्यात ठेवा - कांदा रडवणार नाही
- वॉशिंग मशीनमध्ये कपडे घालण्यापूर्वी मशीनचा टायमर कमी ठेवा. घाणेरडे कपडे धुण्यासाठी जास्त वेळेचा टायमर सेट करा. यामुळे कपडे धुणे सोपे आणि झटपट होईल. शिवाय वीजही वाचेल.