कठीण स्थितीतही तग धरणाऱ्या काही प्रेमकथा ही दोन व्यक्तींमधील बंधाची ज्वलंत उदाहरणे आहेत. एकावयस्कर जोडप्याच्या एकमेकांवरील प्रेमाची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचल्यानंतर तुम्हाला अजूनही जगात खरं प्रेम शिल्लक असल्याचं जाणवेल. लिओने ट्विटरवर शेअर केलेल्या या स्टोरीत त्याचे पालक आहेत. (70 year old woman donates kidney to husband internet gushes at their love story)
“वडिलांना 98 डायलिसिस सेशन्स करावी लागली आणि आई येथे आठवड्यातून 3 दिवस त्यांच्यासोबत 5-6 तास वाट पाहायची. त्यानंतर त्यानंतर वाचवण्यासाठी तिने तिची किडनी दान केली आणि आता ते दोघेही या दुःखातून बाहेर आले आहेत. मला यापेक्षा चांगली प्रेमकहाणी माहित नाही,” हा गोड मथळा भावूक करणारा आहे.
या फोटोला १३०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून अनेकांनी या स्टोरीमुळे त्यांचा दिवस कसा चांगला झाला ते सांगितले आहे. तर काहीजणांनी या जोडप्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं, 'दोघांनीही एकमेकांचा सहवास आणखी अनेक वर्षे अनुभवावा,' अशा शुभेच्छा दिल्या आहेत.