Join us  

70 year old woman gave birth child : नशिबच! ७० वर्षीय महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म; लग्नानंतर ५४ वर्षांनी हलला पाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:39 AM

70 year old woman gave birth child : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या वयात महिलेच्या गरोदर राहण्याबाबत अनेक शंका होत्या, पण शेवटी सर्व काही ठीक झाले.

आई होण्याचा अनुभव हा जगातील कोणत्याही आनंदापेक्षा सर्वाधिक सुखावणारा असतो. वय वाढलं तर मूल व्हायला अडचणी येतात, असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल.  पण राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका 70 वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला आहे. (70 year old woman gave birth to child with ivf technique) या महिलेच्या पतीचे वय 75 वर्षे आहे. 

सुमारे 54 वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता पण इतकी वर्ष प्रयत्न करूनही मूल होत नव्हतं.  आता आयव्हीएफ तंत्राने, जेव्हा त्यांच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला तेव्हा या जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. (70 year old woman gave birth to child with ivf technique in alwar happiness came in life after 54 years of marriage)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या वयात महिलेच्या गरोदर राहण्याबाबत अनेक शंका होत्या, पण शेवटी सर्व काही ठीक झाले. अल्वरमधील इंडो आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे वैज्ञानिक संचालक आणि भ्रूणशास्त्रज्ञ डॉ पंकज गुप्ता यांनी सांगितले की, चंद्रावती आणि गोपी सिंग हे जोडपे झुंझुनू जिल्ह्यातील सिंघाना गावचे रहिवासी आहेत. बाळाच्या आई चंद्रावती यांचे वय सुमारे ७० आणि गोपी सिंह यांचे वय ७५ वर्षे आहे. लग्नानंतर मूल न झाल्यामुळे दु:खी असलेल्या या जोडप्याने अनेक ठिकाणी उपचार घेतले. 

सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी ते त्यांच्या नातेवाईकामार्फत ते आयव्हीएफ सेंटरमध्ये आले. त्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. चंद्रावती देवी 9 महिन्यांपूर्वी IVF प्रक्रियेद्वारे तिसऱ्या प्रयत्नात गर्भवती होऊ शकल्या. त्यावेळी त्या आनंदी होत्या, पण भीती होती की या वयात गर्भधारणा कशी पूर्ण होणार आणि त्यानंतर यशस्वी प्रसूती होईल की नाही. पण अखेर सोमवारी सर्वकाही शक्य झाले असून सध्या मूल निरोगी आहे.

 भावाला मिळाली बहिणीची माया! २ वर्षांपासून टिंडरवर शोधत होता बहिण, एक सोडून दोन मिळाल्या

गुप्ता यांच्या मते, भारतीय संसदेने डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये एक कायदा संमत केला होता. तो जून 2022 पासून लागू झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता कोणतेही IVF वंध्यत्व केंद्र 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि पुरुषांना उपचार देऊ शकणार नाही किंवा त्यांना मोठ्या वयात उपचार घेता येणार नाहीत. पण हा कायदा लागू होण्याच्या काही काळापूर्वीच हे दाम्पत्य या प्रक्रियेत आले आणि आई-वडील झाले... हे या दाम्पत्याचे नशीब.

पावसाळ्यात घरात गोम, गांडूळ येतात? ४ उपाय, त्रास होईल कमी

या बाळाचे वडील गोपी सिंग हे निवृत्त सैनिक आहेत. त्यांना लष्करातून निवृत्त होऊन 40 वर्षे झाली आहेत. बांग्लादेश युद्धात गोपी सिंग यांनाही गोळ्या लागल्या होत्या. लग्नाच्या जवळपास साडेपाच दशकांनंतर आता त्यांच्या घरात पाळला  हलला.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाराजस्थान