"प्रेमाला वयाचं बंधन नसत" असं आपल्याकडे म्हटलं जात. आपण कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करताना त्याचा रंग, रूप, वजन, उंची किंवा इत्यादी गोष्टी बघून प्रेम करत नाही. प्रेम हे सांगून होणारी गोष्ट नसते, प्रेम हे आपोआप मनापासून केलं जात. प्रेम ही जगातील एक अद्भुत भावना आहे. माणूस हा तरुण वयात असतानाच प्रेमात पडतो असे काही नसते, कोणत्याही वयात आपल्याला प्रेम होऊ शकते. आजपर्यंत आपण प्रेमाचे बरेच किस्से ऐकले असतील. अगदी लैला - मजनू पासून ते हिर - रांझा पर्यंत यांच्या प्रेमाचे आजवर दाखले दिले जातात.
तरुणपणात तर सगळेच कधी ना कधी प्रेमात पडतात, परंतु म्हातारपणी कुणी प्रेमात पडल्याचं आपण क्वचितच ऐकलं असेल. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ (Video) चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्ध डाॅक्टरने त्यांच्या हायस्कुल क्रशला गुडघ्यावर बसून प्रपोज केले आहे. तब्बल ६० वर्षानंतर त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. काय आहे त्यांची ही प्रेमकहाणी पाहूयात(78-year-old man proposes to high school crush after 63 years. Watch video).
नेमकी काय आहे ही प्रेम कहाणी...
ही प्रेम कहाणी आहे थॉमस मैकमीकिनआणि नॅन्सी गैम्बेलची. ७८ वर्षांच्या थॉमस यांनी त्यांच्या हायस्कुल मध्ये असणाऱ्या नॅन्सी गैम्बेल हिला प्रपोज केलं. नॅन्सी त्यांची क्रश होती. ६० वर्षानंतर ते दोघे पुन्हा एकत्र आलेत. हायस्कुल मध्ये शिकत असताना थॉमस यांना नॅन्सी फार आवडायची. नंतर त्या दोघांनी वेगवेगळ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, अधूनमधून ते भेटायचे आणि डेटवर देखील जायचे. कॉलेज मध्ये असताना त्यांनी एकमेकांना डेट सुद्धा केलं, पार्टीलाही जायचे. पण नंतर काही वर्षांनी त्यांचे मार्ग वेगळे झाले आणि ते दोघे आपापल्या आयुष्यात पुढे जात असताना त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केले. मात्र ते एकमेकांना विसरू शकले नव्हते. आज जेव्हा ते ६० वर्षानंतर समोर आले थॉमसने नॅन्सीला एकदम हटके प्रपोज केलंय. थॉमसची पत्नी आणि नैन्सीचा पती यांचं निधन झालंय. थॉमसने नॅन्सीला एअरपोर्टवर प्रपोज केलं, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
अनन्या पांडेच्या इटुकल्या पर्सची किंमत ३६ लाखांहून जास्त, ग्लोबल ब्रॅण्डचा नवा भारतीय चेहरा...
साडी तीही तब्बल २१ लाख रुपयांची ! लखनऊच्या साडीचे आगळेवेगळे नवाबी थाट...
थॉमस यांनी नॅन्सीला कोणत्या हटके स्टाईलने प्रपोज केलं आहे...
या व्हिडीओमध्ये थॉमस हे त्यांची हायस्कूल क्रश नॅन्सीची एअरपोर्टवर आतुरतेले वाट पाहत उभे आहेत. काही वेळानंतर नॅन्सी एअरपोर्टवर पोहोचते आणि ते दोघे एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. त्यानंतर थाॅमस नॅन्सीला एका एअरपोर्टवर असणाऱ्या बाकाकडे घेऊन जातात आणि बसायला लावतात. नंतर अगदी वेळ न दवडत ते लगेच गुडघ्यावर बसून नॅन्सीला प्रपोज करतात आणि त्यांनी लिहून आणलेले प्रेमपत्र वाचतात. त्यावर उत्तर देत नॅन्सी "हो , मला हे प्रपोजल मान्य आहे असे उत्तर देते." हा व्हिडीओ आता चांगलच व्हायरल होत असून आत्तापर्यंत या व्हिडीओला ८ लाख लोकांनी लाईक केले आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाखो कमेंट्स देखील केल्या आहेत.