Join us  

माधुरी आपलं किचन कसं स्वच्छ-नीटनेटकं ठेवते पाहा; ७ टिप्स, तुमचंही किचन दिसेल नवंकोरं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 3:17 PM

Kitchen Safety Hacks by Madhuri Dixit Nene (Cooking Hacks) : रात्री झोपण्याच्या आधी गॅस आणि सिलेंडरचे बटन्स, रेग्युलेटर ऑफ करून नंतर झोपा.

रोज पसारा आवरला, किचन स्वच्छ केलं तरी घर घाणं दिसतं अशी तक्रार अनेकांची असते. (Kitchen Hacks) किचन ही खूप सेंसिटिव्ह जागा असते. किचन कितीही आवरलं तरी पुन्हा अस्वच्छ दिसतं. किचन स्वच्छ ठेवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत नेने यांनी  काही किचन टिप्स शेअर केल्या आहेत. (Cooking Tips)  या टिप्सचा वापर करून घर सुरक्षित आणि स्वच्छ ठेवू शकता. (Kitchen Safety Hacks by Madhuri Dixit Nene) किचन सेफ्टीबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. (Kitchen Hacks Safety Tips)

१) रात्री गॅस बंद करून झोपा

रात्री झोपण्याच्या आधी गॅस आणि सिलेंडरचे बटन्स, रेग्युलेटर ऑफ करून नंतर झोपा. असं केल्याने गॅस लिक होण्याचा धोका टळतो. लोक फक्त गॅसचे बटण बंद करतात पण रेग्युलेटर ऑफ करत नाहीत. 

२) ओल्या हातांनी स्विचला हात लावू नका

ग्राईंडर, मिक्सर सारखे अप्लायंसेस चालवण्यासाठी ओल्या हातांचा वापर करू शकता. स्वीच ऑन करण्यासाठी हात कोरडे असावेत. कारण ओल्या हातांनी स्विचला स्पर्श केल्यामुळे करंट लागू शकते. 

३) काहीही फरशीवर पडल्यानंतर लगेच स्वच्छ करा

किचनमध्ये काम करतान  तेल, पाणी, लिक्विड असे अनेक पदार्थ खाली पडत असतात. अशावेळी काहीही खाली पडलं लगेच पुसून घ्या. यामुळे पाय स्लिप होण्याचा धोका टळतो. 

४) आगीपासून बचाव करण्यासाठी तयार  राहा

जेवण बनवताना हाताला चटका लावण्याची शक्यता असते किंवा लाग लागण्याचा धोका असतो. अशा स्थितीत दुखापत टाळण्यासाठी एक्टिंग्विशर नेहमी किचनमध्ये ठेवा. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता येतं.

कॅल्शियम हवं पण दूध-दही आवडत नाही? ५ पदार्थ खा- कॅल्शियम मिळेल भरपूर, फॅक्चरचा टळेल धोका

५) किचनमध्ये फर्स्ट एड बॉक्स ठेवा

जेवण बनवताना अनेकदा हात कापले जातात, हातावर गरम पाणी किंवा तेल पडतं आणि हात-पाय जळण्याचा धोका असतो.  यासाठी फर्स्ट एड बॉक्स किचन कॅबिनेटमध्ये ठेवा.

पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

६) स्मोक अलार्म लावा

आपण घरात नसताना घरात कोणतीही वस्तू जळत असेल तर स्मोक अलार्म फायदेशीर ठरू शकतो. यामुळे गंभीर स्थिती येण्यापासून रोखता येतं. 

७) या गोष्टींची काळजी घ्या

किचनमध्ये इमरजेंसी नंबर अशा ठिकाणी लिहा जिथे सहज जिथे कोणाचेही लक्ष जाईल. लहान मुलांना जेवण बनवताना किचनमध्ये येऊ देऊ नका. फ्रिजरमध्ये आईस पॅक ठेवा जेणेकरून सूज कमी होईल आणि तुम्ही याचा वापर करू शकाल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स