Join us  

८ महिन्यांची मुलगी संस्कृत बोलतेय? कसं शक्य आहे..व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 11:20 AM

8 Month Old Girl Speaks Sanskrit : संस्कृत बोलणे फार सोपे वाटत नसताना लहान मुलगी ते बोलते .. हेच कौतुक

शाळेत असताना आपल्यापैकी बऱ्याच लोकांना संस्कृत विषय म्हटल की कपाळावर आट्या यायच्या. संस्कृत विषय कायम कंटाळवाणा वाटायचा. संस्कृत शब्दांचे उच्चार करणं फारच कठीण असल्यामुळे ती भाषा आपल्याला कठीण वाटते. परंतु संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात समृद्ध भाषा मानली जाते. आजकाल अनेक शाळांमध्ये संस्कृत विषय हा केवळ स्कोरिंग करण्यासाठीचा विषय म्हणून मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची गोडी पाहिजे तशी निर्माण झाली नाही. केवळ पुस्तकी ज्ञानामुळे ही भाषा रोजच्या व्यवहारात आपण वापरत नाही. जर ८ महिन्यांची चिमुरडी आपल्या आईसोबत संस्कृतमध्ये, गप्पा मारत असेल तर... ऐकून आश्चर्य वाटलं ना... सोशल मीडियावर सध्या या चिमुकलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्या वयात एखाद लहान बाळ बोबडे बोल बोलायला सुरुवात करत तिथे चक्क ही चिमुरडी आईच्या प्रश्नांना थेट संस्कृत भाषेत उत्तर देत आहे. 

या व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, मायलेकी कश्या संस्कृत मध्ये गप्पा मारत आहेत. छान पिवळा स्वेटर परिधान केलेली एक चिमुरडी बेडवर निवांत पहुडली आहे. समोर तिची आई आहे. तिची आई एक एक करून तिला प्रश्न विचारत आहे. शेरास सव्वा शेर बनून अगदी बिनधास्तपणे ही मुलगी आईच्या प्रश्नांची उत्तर देत आहे. आपण केवळ ८ महिन्याचे असताना आपल्याला सगळ्या गोष्टींकरिता आईवर किंवा घरातल्या मंडळींवर अवलंबून राहावे लागते. आठव्या महिन्यात बाळ आईच बोट धरून चालण्याचा प्रयत्न करते, किंवा बाळासोबत बोलत असताना ते हुंदके देऊन प्रतिसाद देत असते. परंतु ही चिमुरडी त्याही  पुढे जाऊन संस्कृत भाषा बोलायला लागली, हे नवलच म्हणावे लागेल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. यावरून ही मुलगी भविष्यात संस्कृत भाषा पंडित होईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

GiDDa CoMpAnY या अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रचंड पसंती दर्शविली आहे. हा सगळ्या रिल्सपैकी आतापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडीओ आहे, अशी एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ? या व्हिडिओत दिसणाऱ्या मायलेकी नेमक्या कोण आहेत ? याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया