घरातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे किचन. किचन जितकं साफ राहेल, तितकं जेवण बनवण्याची उर्जा वाढते. धावपळीच्या या जीवनशैलीत किचनकडे लक्ष द्यायला जमत नाही. सकाळी टिफिन करण्याच्या घाईत किचनमध्ये इतर साहित्य पसरलेले राहतात. अस्वच्छ किचनमुळे विवीध आजार देखील उद्भवू शकतात. जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
ज्याप्रमाणे न चुकता आपण घरातील इतर खोलींची सफाई करतो, त्याचप्रमाणे किचनची सफाई करणं देखील तितकंच गरजेचं आहे. जेवण बनवताना फोडणीचा धूर किचनभर पसरतो. ज्यामुळे किचनमधील बाकीच्या गोष्टी चिकट - घाण होतात. याशिवाय स्वयंपाकघरातील स्लॅब, सिंक इत्यादी साफ न केल्यास त्यामध्ये हानिकारक जीवाणू वाढू लागतात. जर आपल्याला किचन साफ करणे हे कंटाळवाणे वाटत असेल तर, या १० टिप्स फॉलो करा(8 Tips for Keeping Your Kitchen Clean).
१. भांडी धुतल्यानंतर आपण अनेकदा तसेच ठेऊन देतो. ही भांडी बाहेर ठेऊ नका, योग्य जागी ठेवल्यानंतर किचनमधला पसारा कमी दिसतो.
२. भाजी चिरताना २ पॉलिथिन सोबत ठेवा, एका पिशवीत चिरलेली भाजी ठेवा, व दुसऱ्या पिशवीत भाजीची साले व घाण ठेवा. यामुळे किचनमध्ये घाण पसरणार नाही.
मला वेड लागले रील्स बघण्याचे! असं झालं असेल तर सावधान, मायग्रेनचा धोका आणि..
३. मसाल्यांचा डबा, काचेचे कप, व ग्लास इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी स्वतंत्र कॅबिनेट वापरा. मसाल्यांचा डबा स्लॅबवर ठेवण्याऐवजी कॅबिनेटमध्ये ठेवा.
४. भाजीला फोडणी देताना तेल भिंतींवर किंवा कॅबिनेटच्या लाकडावर पडते. तेलाचे हे डाग साफ न केल्यास ते चिकट होतात. त्यामुळे शेगडीजवळील जागा जेवण बनवल्यानंतर लगेच पुसून काढा.
५. मायक्रोवेव्ह ओव्हनला नेहमी साफ करा. यात पदार्थ करत असताना ओव्हन नकळत घाण होतेच, त्यामुळे पदार्थ केल्यानंतर लगेच साफ करा.
६. काही लोकांच्या स्वयंपाकघरातील सिंक खूप अस्वच्छ असते. सिंकमधील जाळ्यात घाण अडकून राहते, ज्यामुळे ते ब्लॉक होण्याची शक्यता वाढते. त्यातून दुर्गंधी येऊ लागते. भांडी साफ केल्यानंतर सिंकमध्ये अडकलेला कचरा फेकून द्या. पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा.
ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल
७. नको असलेली वस्तू किचनमधून काढून टाका, या वस्तूंमुळे किचन भरलेला व किचकट वाटतो. किचनमध्ये वापरण्यात येणारे वस्तू फक्त किचनमध्ये ठेवा.
८. महिन्यातून एक दिवस काढा, व संपूर्ण किचन स्वच्छ करा. किचन स्वच्छ राहिले तर आपले आरोग्य देखील उत्तम राहेल.