Lokmat Sakhi >Social Viral > आजी-आजोबांचा सुंदर रोमँटिक डान्स, एकदम प्यारवाली लव्हस्टोरी ! पाहा व्हायरल व्हिडिओ

आजी-आजोबांचा सुंदर रोमँटिक डान्स, एकदम प्यारवाली लव्हस्टोरी ! पाहा व्हायरल व्हिडिओ

या वयातही हे दोघेही इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 06:02 PM2022-05-05T18:02:37+5:302022-05-05T18:06:26+5:30

या वयातही हे दोघेही इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

A beautiful romantic dance of grandparents, a lovely love story! Watch the viral video | आजी-आजोबांचा सुंदर रोमँटिक डान्स, एकदम प्यारवाली लव्हस्टोरी ! पाहा व्हायरल व्हिडिओ

आजी-आजोबांचा सुंदर रोमँटिक डान्स, एकदम प्यारवाली लव्हस्टोरी ! पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsडान्समुळे अनपेक्षितपणे हे पंजाबी कपल सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले असून काही दिवसांत फेमस झाले आहे.य़ा वयातही त्यांच्यात असलेला उत्साह खरंच वाखाणण्याजोगा आहे

वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. यामध्ये कधी एखाद्या आजीबाईने केलेला डान्स असतो तर कधी एखाद्या लहानग्या मुलाने केलेला. सोशल मीडियामुळे हे व्हिडिओ काही वेळात जगभरात पसरतात आणि त्याला नेटीझन्सची पसंतीही मिळते. असाच एका पंजाबी वयस्कर जोडप्याचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून हे दोघेही अतिशय उत्तम डान्स करत असल्याचे दिसत आहे. वयाच्या मानाने त्यांचा डान्सचा स्पीड आणि त्यातील स्टेप्स इतक्या सुंदर आहेत की हे दोघेही प्रोफेशनल डान्सर आहेत असेच वाटावे. 

(Image : Google)
(Image : Google)

एकमेकांना साथ देत ते करत असलेल्या डान्सच्या स्टेप्स पाहताना अतिशय क्यूट वाटत आहेत. एका समारंभात हे दोघेही अतिशय मन लावून डान्स करत असून त्यांच्या वयाच्या मानाने ते अतिशय छान स्टेप्स करत असल्याने सोशल मीडियावर त्यांचे बरेच कौतुक होत आहे. या आजोबांनी छानसा कोट घातला असून त्यांच्या पांढऱ्या दाढीमुळे ते एकदम क्यूट दिसत आहेत. तर आजींनीही गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून डान्स करताना खास गॉगल घातला आहे. लंबोर्गिनी डान्स करत असलेल्या या कपलच्या मागे लाईव्ह गायन आणि वादनाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसते. या वयातही हे दोघेही इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावर या वयातही असलेला उत्साह आपल्यालाही एनर्जी देणारा ठरू शकतो.

त्यांचे नेमके वय माहित नसले तरी ते ७० च्या आसपास असेल असा अंदाज आहे. डान्स ही संवाद साधण्याची एक भाषा आहे असे या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर या कपलच्या डान्सचा क्यूट व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून १.५ लाखाहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर अनेकांनी डान्सच्या स्टेप्स इतक्या छान केल्याबद्दल या दोघांचे खूप कौतुक केले आहे. याआधीही या कपलच्या वेगवेगळ्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आपल्या डान्समुळे अनपेक्षितपणे हे पंजाबी कपल सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले असून काही दिवसांत फेमस झाले आहे.

Web Title: A beautiful romantic dance of grandparents, a lovely love story! Watch the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.