Join us  

बेडवर टाकलेलं बेडशीट २ दिवसांतच चुरगळतं? २ उपाय, बेडशीट राहील इस्त्री केल्याप्रमाणे ताठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 3:20 PM

Home Hacks For Bed And Bed Sheets: बेडवर बेडशीट टाकलं की २ दिवसांतच ते कोपऱ्यातून निसटतं आणि लगेच चुरगळतं.. असं होऊ नये म्हणून बेडवर बेडशीट  टाकताना काय करावं, याविषयी या काही टिप्स.. (How To Put A Bed Sheet On A Bed?)

ठळक मुद्देबेडशीट कसं टाकावं, बेडशीटचे कोपरे गादीखाली व्यवस्थित कसे दाबून घ्यावेत, याविषयी या काही टिप्स..

डबल बेड किंवा सिंगल बेड यावर आपण जेव्हा बेडशीट घालतो तेव्हा बेडशीटचे चारही कोपरे व्यवस्थित गादीखाली दाबून घेतो. पण दोनच दिवसांत गादीखाली दाबलेलं बेडशीट हळूहळू बाहेर येऊ लागतं. लगेचच मग बेडशीटवर आढ्या पडलेल्या दिसतात. बेडशीट गोळा होतं आणि चुरगळल्यासारखं वाटतं. असं होऊ नये म्हणून बेडशीट कसं टाकावं, बेडशीटचे कोपरे गादीखाली व्यवस्थित कसे दाबून घ्यावेत, याविषयी या काही टिप्स.. यामध्ये आपण २ उपाय बघणार आहोत. त्यामुळे मग बेडशीट बाजूंनी निघणार नाही आणि गोळा झाल्यासारखे वाटणार नाही. (What is the proper way to put sheets on a bed?)

 

बेडशीट गोळा होऊ नये म्हणून उपाय१. हा पहिला जो उपाय आहे तो इन्स्टाग्रामच्या panda_art_and_craft या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यासाठी सगळ्यात आधी बेडच्या एका बाजुने बेडशीट गादीखाली व्यवस्थित घालून घ्या.

घरात जुन्या कपड्यांचा ढिग पडलाय? बघा ६ उपाय, जुने कपडेही नव्यानं वापरु शकता..

आता जेव्हा तुम्ही बेडच्या कोपऱ्यावर असाल तेव्हा बेडशीट बेडच्या उजव्या किंवा डाव्या कोपऱ्याला वळवा आणि बेडशीटचा छोटासा भाग गादीखाली टाका आता पुन्हा बेडशीट खाली करा आणि मग गादीखाली दाबून घ्या. ही पद्धत सविस्तरपणे लक्षात येण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.

 

२. दुसरा उपाय देखील अतिशय सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी बेडशीटचे जे चारही कोपरे आहेत त्यावर एक वीत जागा सोडा आणि गाठी मारा.

जीन्स धुताना ३ चुका टाळा, जीन्स लवकर खराब होणार नाही, दिसेल अनेक वर्षे नव्यासारखी

या गाठी आता गादीच्या चारही कोपऱ्यांखाली येतील, अशा पद्धतीने मारलेल्या असाव्या. गाठी कोपऱ्याखाली फिक्स केल्या की मग चारही बाजुंनी बेडशीट गादीखाली दाबून घ्या. 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स