भारतासारख्या काही देशांमध्ये जन्मदर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत तर जपानसारख्या देशात जन्मदर कसा वाढवावा म्हणून तिथले नेते चिंताक्रांत आहेत. भविष्यात जपान हे एक स्थिर राष्ट्र असावं यासाठी तिथला जन्मदर २.१ एवढा असणं गरजेचं आहे. पण तो या प्रमाणित जन्मदरापेक्षा खूप कमी म्हणजेच १.२ वर आहे. त्यामुळे तिथल्या राज्यकर्त्यांची चिंता वाढली असून ते आता जन्मदर कसा वाढेल यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत. त्यानुसारच टोकियो गव्हर्नर युरिको कोइके यांनी एक निर्णय घेतला असून त्यानुसार आता २०२५ च्या एप्रिल महिन्यापासून तेथील सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा ४ दिवसांचाच असेल. ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असा त्यांचा आठवडा असणार आहे.(Tokyo plans to introduce a four-day workweek for its government employees for increasing birth rate in Japan)
लोकसंख्या वाढीसाठी असा निर्णय का घेण्यात आला असावा, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण सध्या जपानमधली परिस्थिती अशी आहे की तिथले वर्क कल्चर खूप कठीण आहे. त्यामुळे बहुसंख्य महिलांना बाळ की करिअर या दोन्हीपैकी एकच गोष्ट निवडावी लागते.
रात्री लवकर झोप येत नाही, लगेच झोपमोड होते? ५ गोष्टी करा, अंथरुणावर पडताच शांत झोपाल
आपण आपल्या देशातही अशा अनेक मुली पाहतो ज्या करिअरमुळे पाळणा लांबवतात. तसंच जपानमध्येही आहे. पण आपल्या तुलनेत तिथले वर्क कल्चर, कामाचे तास हे खूप जास्त कठीण आहेत. त्यामुळे आपल्याकडे काम आणि मुलं या दोन्ही आघाड्या सांभाळत महिलांना जसं पुढे जाता येतं, तसं तिथे होत नाही. त्यामुळे हल्लीच्या तरुण जपानी मुली बाळाऐवजी कामाला प्राधान्य देतात.
त्याचा परिणाम आपोआपच जन्मदर आणखी कमी होण्यावर होतो. त्यामुळे टोकियो गव्हर्नरला महिलांसाठी असे वर्क कल्चर निर्माण करायचे आहे की ज्याचा त्यांना ताण येणार नाही. तसेच मुलं आणि करिअर या दोन्ही गोष्टी त्यांना एकाचवेळी झेपू शकतील.
मुळ्याचे रायते करण्याची रेसिपी, हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार
आठवड्यातील कामाचे दिवस कमी करण्यासोबतच फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स ठेवण्याकडेही त्यांचा कल आहे. तसेच ज्यांची मुलं लहान आहेत, अशा पालकांना कामाच्या तासात इतर काही सवलतीही देण्याचा विचार आहे. गेल्यावर्षीच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये एका वर्षी जवळपास ७ लाख २७ हजार बाळांचा जन्म झाला. हे प्रमाण या निर्णयांमुळे वाढेल अशी टोकिया गव्हर्नरला आशा आहे.