Lokmat Sakhi >Social Viral > कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी?

कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी?

Social Viral Video कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. अशातच चीनमध्ये एका जोडप्याचा देसी जुगाड पाहून नेटकरी थक्क झालेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 06:46 PM2022-12-26T18:46:41+5:302022-12-26T18:48:07+5:30

Social Viral Video कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. अशातच चीनमध्ये एका जोडप्याचा देसी जुगाड पाहून नेटकरी थक्क झालेत..

A Chinese couple went and sat in a balloon to protect themselves from Corona, look at this amazing trick - the video is viral, why will you copy it? | कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी?

कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी?

पूर्ण जगताला हलवून टाकणारा रोग म्हणजे कोरोना. या व्हायरसमुळे अनेकांचे प्राण गेले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या. या कारणामुळे कित्येकांना हालाखीचे दिवस काढावे लागले. सध्या चीनमध्ये पुन्हा कोरोना डोकेवर काढू लागले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत असून, करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्यकेजण विशेष काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, तेथील एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कपल प्लास्टिकच्या मोठ्या फुग्यासारख्या आवरणामध्ये उभे असलेले दिसत आहेत. त्यांनी छत्री प्रमाणे  प्लास्टिकच्या या आवरणाला अशाप्रकारे तयार केले आहे की, त्याने पुर्ण शरीराचे संरक्षण केले जाते. तसेच ते घेऊन सहज फिरता देखील येते.

हा भन्नाट जुगाड नेटकऱ्यांना आवडला असून, या कल्पनेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Web Title: A Chinese couple went and sat in a balloon to protect themselves from Corona, look at this amazing trick - the video is viral, why will you copy it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.