Lokmat Sakhi >Social Viral > चिमुकलीला करायची होती आईची नक्कल, म्हणून मग तिच्या बाबांनी..... बघा व्हायरल व्हिडिओ

चिमुकलीला करायची होती आईची नक्कल, म्हणून मग तिच्या बाबांनी..... बघा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of A Cute Little Girl: लेकीचा हट्ट पुरविण्यासाठी आई- बाबा त्यांना शक्य होईल ते ते सगळं करायचा प्रयत्न करत असतात... हेच सांगणारा हा एक मस्त व्हिडिओ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 05:04 PM2022-12-01T17:04:21+5:302022-12-01T18:08:26+5:30

Viral Video Of A Cute Little Girl: लेकीचा हट्ट पुरविण्यासाठी आई- बाबा त्यांना शक्य होईल ते ते सगळं करायचा प्रयत्न करत असतात... हेच सांगणारा हा एक मस्त व्हिडिओ.

A cute little girl wants to copy her mother, then see what her father did to fulfill daughter's wish | चिमुकलीला करायची होती आईची नक्कल, म्हणून मग तिच्या बाबांनी..... बघा व्हायरल व्हिडिओ

चिमुकलीला करायची होती आईची नक्कल, म्हणून मग तिच्या बाबांनी..... बघा व्हायरल व्हिडिओ

Highlights लेकीच्या मनातली इच्छा तिच्या वडिलांनी ओळखली आणि मग एक गंमतच केली.

लहान मुलं कधी कोणता नाद घेतील आणि त्या नादापायी पालकांना काय- काय करायला लावतील, काही सांगता येत नाही. मुलांना कळायला लागल्यापासून ते साधारण ५ वर्षांचे होईपर्यंत अनेक चिमुकल्यांना एक सवय असते. ती सवय म्हणजे त्यांच्या आई- वडिलांना कॉपी करणे. मुलगी आईची तर मुलगा बाबांची नक्कल (little girl wants to copy her mother) करताना आपण आपल्या घरात आणि इतरांच्याही घरात नेहमीच बघतो. बऱ्याचदा तर मुली आईचे कपडे, दागिने, चपला असं जमेल त्या आईच्या गोष्टी घालण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओमध्येही या चिमुकलीचा तसाच एक गमतीशीर प्रयत्न सुरू आहे.(Viral Video Of A Cute Little Girl) 

 

सोशल मिडियावर लहान मुलांचे वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. हा असाच एक व्हिडिओ सध्या गाजतो आहे. लहान लेकरू असणाऱ्या कोणत्याही घरात दिसून येईल, असंच हे चित्र आहे.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे तर रोज खा ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात हार्टवरचा ताण कमी करायचा तर..

alesofanaughtytoddler या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यामध्ये सुरुवातीला आई आणि तिची साधारण दोन ते अडीच वर्षांची लेक दिसते आहे. आईने गुलाबी रंगाचा घेरदार ड्रेस घातला असून ती त्या ड्रेसचा घेर हातात धरून गोल फिरून नाचते आहे. ते पाहताच तिची लेक दुडूदुडू धावत येते आणि तिचा ड्रेस हात धरून आईसारखंच नाचण्याचा प्रयत्न करते. 

 

पण तिचा ड्रेस आईच्या ड्रेससारखा काही छान फिरतच नाही. कारण तिच्या ड्रेसला तेवढा घेरच नाही. लेकीच्या मनातली ही इच्छा तिच्या वडिलांनी ओळखली आणि मग एक गंमतच केली.

जान्हवी कपूरचा चमचमता नारंगी ‘इलेक्ट्रिफाइंग’ लेहेंगा! सिक्विन, डार्क रंग आवडत असतील तर जान्हवीची स्टाइल पाहाच..

त्यांनी आईचाच ड्रेस मुलीला घातला. तिला वर उचलून घेतले आणि मग तिला त्यांनी स्वत:च गोल- गोल फिरवले. आता गोल- गोल फिरताना आपलाही ड्रेस आईसारखाच सुंदर दिसतो आहे, हे पाहून त्या चिमुकलीची कळी चांगलीच खुलली होती. 


 

Web Title: A cute little girl wants to copy her mother, then see what her father did to fulfill daughter's wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.