Lokmat Sakhi >Social Viral > नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, नाहीतर एम्ब्रॉयडरी होईल खराब...

नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, नाहीतर एम्ब्रॉयडरी होईल खराब...

6 rules for ironing hand embroidery cloths at home : अतिशय बारीक व नाजूक धागाकाम, मोतीवर्क, नक्षीकाम, एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या कपड्यांची इस्त्री करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 03:50 PM2023-08-21T15:50:55+5:302023-08-21T16:18:29+5:30

6 rules for ironing hand embroidery cloths at home : अतिशय बारीक व नाजूक धागाकाम, मोतीवर्क, नक्षीकाम, एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या कपड्यांची इस्त्री करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी....

A Step-By-Step Guide to Iron Your Embroidered Outfits at Home. | नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, नाहीतर एम्ब्रॉयडरी होईल खराब...

नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, नाहीतर एम्ब्रॉयडरी होईल खराब...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना कपड्यांना करकरीत इस्त्री केल्याशिवाय ते कपडे अंगावर घालावेसेच वाटत नाही. काही कपड्यांचे फॅब्रिक असे असते त्यांना इस्त्री नाही केली तरीही चालते, परंतु काही फॅब्रिक असे असतात की त्यांना कायम कडक इस्त्रीची गरज भासते. आपण कपड्यांच्या फॅब्रिकनुसार त्याला इस्त्री करायची की नाही ते ठरवतो. काहीवेळा कपड्यांवरील टॅग वाचून हे कपडे कसे धुवायचे, त्यांना किती तापमानावर ठेवून इस्त्री करावी या सगळ्या सूचना फॉलो करून आपण कपड्यांना इस्त्री करताना त्यांची काळजी घेतो. 

आपल्याकडील काही कपडे असे असतात की त्यांच्यावर अतिशय बारीक व नाजूक धागाकाम, मोतीवर्क, नक्षीकाम, एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असते. असे कपडे धुताना व त्यांना इस्त्री करताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा कपड्यांची बारकाईने विशेष काळजी घेतली नाही तर त्यावरील बाजूक नक्षीकाम खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, हे कपडे खराब होऊ नये म्हणून इस्त्री करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे पाहूयात(A Step-By-Step Guide to Iron Your Embroidered Outfits at Home).

एम्ब्रॉयडरी किंवा इतर नाजूक नक्षीकाम केलेल्या कापडयांना इस्त्री करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी. 

१. इस्त्रीच्या टेम्परेचर चेकिंगकडे लक्ष द्यावे :- एम्ब्रॉयडरी किंवा इतर नाजूक नक्षीकाम केलेल्या कापडयांना इस्त्री करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही नाजूक फॅब्रिकवर इस्त्री करताना त्या इस्त्रीचे तापमान कपड्याला सोसवेल इतके असावे. अतिशय कमी किंवा जास्त असू नये यामुळे कपडे खराब होण्याची शक्यता असते. इस्त्रीच्या पृष्ठभागाशी असणाऱ्या लोखंडाच्या उच्च तापमानामुळे नक्षीदार धाग्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ते खराब होऊ शकतात. यामुळे शक्यतो इस्त्री कमी तापमानावरच ठेवावी.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

२. सुती कापडाचा वापर करा :- काहीवेळा असे होते की कमी उष्णतेच्या सेटिंगमध्ये देखील फॅब्रिकवरची एम्ब्रॉयडरी खराब होण्याची शक्यता असते. असे होऊ नये, म्हणून सुती कापडाची मदत घ्या. नक्षीदार कापडावर इस्त्री करताना त्या एम्ब्रॉयडरी वर्कवर सुती कापड ठेवा. या एम्ब्रॉयडरी वर्कवर सुती कापड ठेवल्याने  हे एम्ब्रॉयडरी वर्क आणि इस्त्रीचा लोखंडी पृष्ठभाग यांच्यामध्ये एक प्रकारचे अंतर निर्माण होते. त्यामुळे कापडावरील एम्ब्रॉयडरी वर्क खराब होत नाही.

हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...

३. कापडावर इस्त्री ठेवून टेस्टिंग करा :- एम्ब्रॉयडरी वर्क केलेले कपडे इस्त्री करण्यापूर्वी, ते एकदा तपासून घेणे फार महत्वाचे आहे. संपूर्ण कपड्याला इस्त्री करण्यापूर्वी फॅब्रिकच्या एका लहान, विरुद्ध बाजूला थोडीशी इस्त्री फिरवून पाहावी. असे केल्याने, इस्त्रीचे तापमान हे त्या कापडासाठी योग्य आहे का अयोग्य हे  तपासून पाहण्यास मदत मिळते. कपड्याच्या या छोट्याशा लहान कोपऱ्यात इस्त्री केल्याने ते कापडं इस्त्री केल्याने खराब होते की नाही हे लक्षात येईल. इस्त्री केल्यानंतर धागा किंवा फॅब्रिकच्या रंगात आणि पोत यामध्ये काही फरक जाणवल्यास, इस्त्री करू नका.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

४. इस्त्री करण्याची योग्य पद्धत :- कपड्यांना इस्त्री करण्याची प्रत्येकाची एक आपली पद्धत असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार कापडयांना इस्त्री करत असतो. इस्त्री करताना अशा नाजूक फॅब्रिक्सची खूप काळजी घेऊन इस्त्री करणे गरजेचे असते. शक्यतो, अशा नाजूक व बारीक एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या कपडयांना घरी इस्त्री करताना ते कपडे उलटे करून म्हणजेच आतली बाजू बाहेर काढून इस्त्री करून घ्यावी. यामुळे नाजूक कपड्यांवर किंवा कपड्याच्या एम्ब्रॉयडरी वर्कला इस्त्रीची थेट उष्णता लागत नाही, त्यामुळे नाजूक कपड्यांना इस्त्री करताना, इस्त्री करण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करावा. 


 
५. कपड्यांवर जास्त दाब देऊ नका :- नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क केलेले कपडे इस्त्री करताना त्यांच्यावर जास्त दाब देऊ नका. जेव्हा आपण कपड्यांवर खूप दाब देऊन इस्त्री करता त्यामुळे कपडे खराब होण्याची शक्यता असते. म्हणून, नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क केलेले नक्षीदार कपडे नेहमी हलक्या हाताने इस्त्री करावेत. 

६. नाजूक कपड्यांना स्टिमिंग करू नये :- कपडे इस्त्री करताना आपण स्टिमिंगचा पर्याय देखील निवडतो. पण जेव्हा आपल्याला एम्ब्रॉयडरी केलेले कपडे इस्त्री करायचे असतील, तेव्हा आपण ते स्टिमिंग करणे टाळावे. नाजूक कपड्यांना स्टिमिंग केल्याने फॅब्रिक आणि धाग्यात ओलावा निर्माण होऊ शकतो आणि यामुळे नाजूक एम्ब्रॉयडरी वर्कचे नुकसान होऊ शकते.

Web Title: A Step-By-Step Guide to Iron Your Embroidered Outfits at Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.