Lokmat Sakhi >Social Viral > स्कीन कॅन्सरच्या जनजागृतीसाठी २५०० लोक जेव्हा नग्न आंदोलन करतात, ऑस्ट्रेलियातील अनोखी घटना..

स्कीन कॅन्सरच्या जनजागृतीसाठी २५०० लोक जेव्हा नग्न आंदोलन करतात, ऑस्ट्रेलियातील अनोखी घटना..

Australia Sydney Skin Cancer Awareness त्वचेच्या कॅन्सरसह जगणाऱ्या किंवा त्यामुळे बाधित झालेल्या २५०० लोकांचा ऑस्ट्रेलियात अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 06:41 PM2022-11-28T18:41:11+5:302022-11-28T18:42:47+5:30

Australia Sydney Skin Cancer Awareness त्वचेच्या कॅन्सरसह जगणाऱ्या किंवा त्यामुळे बाधित झालेल्या २५०० लोकांचा ऑस्ट्रेलियात अनोखा उपक्रम

A unique event in Australia when 2,500 people protested naked for skin cancer awareness. | स्कीन कॅन्सरच्या जनजागृतीसाठी २५०० लोक जेव्हा नग्न आंदोलन करतात, ऑस्ट्रेलियातील अनोखी घटना..

स्कीन कॅन्सरच्या जनजागृतीसाठी २५०० लोक जेव्हा नग्न आंदोलन करतात, ऑस्ट्रेलियातील अनोखी घटना..

एखाद्या गोष्टीला जर विरोध दर्शवायचा असेल, अथवा एखाद्या गोष्टीसंदर्भात जागृती निर्माण करायची असेल, तर एक समूह बनवून अनेकदा त्या विशिष्ट गोष्टीचा एकत्र निषेध करण्यात येतो. प्रत्येक देशात विरोध दर्शवण्याची शैली वेगळी असते. एखाद्या मागणीबद्दल किंवा घटनेबद्दल निषेध करण्याच्या बातम्या आपण पाहतच असतो. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात एक वेगळ्याच पद्धतीचा विरोध समोर आला आहे. यात हजारो लोकांनी चक्क कपडे न घालता एका जनजागृती कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या जनजागृती कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

सिडनी शहरातील बोंडी बीचवर हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे. या बीचवर तब्बल २५०० लोक एकत्र जमले होते. त्वचेच्या कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी हे सर्व लोक एकत्र जमले होते.
या आंदोलनासाठी जमलेल्या २५०० लोकांनी प्रशासनाकडून आधीच परवानगी घेतली होती. या कार्यक्रमात सहभागी झालेले बहुतांश लोकं कर्करोगाशी संबंधित आहेत. त्यातील काही जणांना कर्करोग झाला आहे, किंवा ते कर्करोग असणाऱ्यांना मदत करत आहेत.

ऑस्ट्रेलियन लोकांनी आपल्या त्वचेची तपासणी करत राहावी. यातून अनेकांना प्रोत्साहन मिळावे, या मुख्य गोष्टीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगात त्वचेच्या कर्करोगाचे सर्वात जास्त प्रमाण ऑस्ट्रेलियात आहे, अंशी वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने माहिती दिली आहे. त्यामुळेच हा जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला.

अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्यूनिक जगातील वेगवेगळ्या ठिकाणी न्यूड फोटोशूटसाठी ओळखले जातात. ट्यूनिक यांनीच ऑस्ट्रेलियातील या फोटोशूटचे आयोजन केले होते. त्वचेच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्याची ही उत्तम संधी आहे. येथे येऊन फोटो काढण्याचा मला अभिमान वाटतो. अशा भावना या मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमाने सर्व जगाचेच लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर तर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Web Title: A unique event in Australia when 2,500 people protested naked for skin cancer awareness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.