Lokmat Sakhi >Social Viral > फळांची गाडी ढकलणाऱ्या महिलेला शाळकरी मुलांनी केली मदत, पाहा माणुसकीचा व्हायरल व्हिडिओ

फळांची गाडी ढकलणाऱ्या महिलेला शाळकरी मुलांनी केली मदत, पाहा माणुसकीचा व्हायरल व्हिडिओ

Little School Kids Help Woman Struggling To Push Loaded Fruit Cart Viral Video : लहान वयात चिमुकल्यांनी केलेली कृती खरंच कौतुकास्पद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 05:24 PM2022-08-10T17:24:41+5:302022-08-10T19:00:50+5:30

Little School Kids Help Woman Struggling To Push Loaded Fruit Cart Viral Video : लहान वयात चिमुकल्यांनी केलेली कृती खरंच कौतुकास्पद...

A woman pushing a fruit cart was helped by school children, see the viral video of Humanity | फळांची गाडी ढकलणाऱ्या महिलेला शाळकरी मुलांनी केली मदत, पाहा माणुसकीचा व्हायरल व्हिडिओ

फळांची गाडी ढकलणाऱ्या महिलेला शाळकरी मुलांनी केली मदत, पाहा माणुसकीचा व्हायरल व्हिडिओ

Highlightsहा व्हिडिओ २ दिवसांत तब्बल ५ लाख २८ हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे.आपली डीग्री हा केवळ कागदाचा तुकडा आहे जोपर्यंत तो आपल्या व्यवहारात येत नाही

लहान मुलांना काही कळत नाही असे म्हणत आपण त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. वयाने लहान असल्याने त्यांनाच आपली गरज असते ते आपल्याला काय मदत करणार असाही आपला अनेकदा समज असतो. पण काही वेळा लहान दिसणारी ही मुलं समजुतीनं खूप मोठ्यांसारखी वागतात. इतकंच नाही तर काही वेळा आपल्या कृतीतूनही त्यांना असलेली समज आपल्याला दिसून येते. अनेकदा आपल्याला एकादी परिस्थिती समोर दिसत असून आपण त्यामध्ये काहीही करत नाही पण लहान मुलांचा निरागसपणा अशावेळी कामी येतो. लहानग्यांमधील माणुसकीचे दर्शन घडवणारा असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हि़डिओचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे (Little School Kids Help Woman Struggling To Push Loaded Fruit Cart Viral Video). 

(Image : Google)
(Image : Google)

व्हिडिओमध्ये एक महिला आपली फळांची गाडी एका चढावर चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. चढ जास्त असल्याने तिच्याकडून ही गाडी वर चढत नाही. याचवेळी तिथून काही महिला जाताना दिसतात, त्या महिला या फळवालीकडे पाहतात मात्र तिला मदत करायची इच्छा त्यांना होत नाही. तेवढ्यात त्या चढावरुन एक लहान शाळकरी मुलगा आणि मुलगी खाली येतात. हे दोघेही शाळेच्या ड्रेसमध्ये असल्याचे दिसते. हे चिमुकले फळवाल्या महिलेच्या गाडीला हात लावत तिला गाडी चढवण्यासाठी मदत करतात. इतके लहान असूनही मदत करण्याची त्यांची इच्छा आणि त्यानंतर प्रत्यक्ष कृती आपल्याला थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मदतीमुळे ही गाडी वर चढते. आपल्याला मदत केल्यामुळे ही फळवाली आपल्या गाडीवरील एक एक केळं या लहानग्यांना देते. ते मिळाल्यावर ते आणखीनच खूश झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. 

महंत आदित्यनाथ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला अतिशय नेमके असे कॅप्शन देण्यात आले आहे. ‘आपली डीग्री हा केवळ कागदाचा तुकडा आहे जोपर्यंत तो आपल्या व्यवहारात येत नाही.’ अवघ्या ३० सेकंदांचा हा व्हिडिओ खूप मोठा आणि महत्त्वाचा मेसेज देणारा ठरतो. ८ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ २ दिवसांत तब्बल ५ लाख २८ हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. ३१ हजारहून अधिक जणांनी त्याला लाईक केले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.   
 

Web Title: A woman pushing a fruit cart was helped by school children, see the viral video of Humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.