साप हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. साप पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्या माणसांचा थरकाप होतो. माणूस असो वा प्राणी सापाला सगळेच खूप घाबरतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किंग कोब्रा झोपलेल्या महिलेवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. (A woman was suddenly attacked by a cobra while she was sleeping on the bed)
भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (@susantananda3) यांनी हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिलेच्या अंगावर एक साप दिसत आहे. अशा स्थितीत ती तिथून पळूनही जाऊ शकत नाहीये. सुशांत यांनी व्हिडीओ ट्विट करून लिहिले की, तुम्ही अशा स्थितीत अडकलात तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
बाथरूमच्या टाइल्सवर खूपच पाणी साचतं? ३ ट्रिक्स, बाथरूम राहील स्वच्छ, कोरडं कायम..
या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करून व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला त्यानं महिलेला वाचवायला हवं होतं असं म्हटलंय दुसरीकडे, आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे- बाप रे बाप, ही महिला वाचली कशी? याआधीही एका चिमुरडीनं हातात साप पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
दरम्यान साप चावल्यानंतर त्या जाही प्रचंड वेदना जाणवतात. सर्प विषारी असेल तर त्याच्या दोन दातांचा चावा चटकन लक्षात येतो. सर्प बिनविषारी असेल अर्धलंबवर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात. उपलब्ध असलेली रिबिन, कापडाची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही उपयोग करून तुम्ही ती जागा बांधून ठेवू शकता. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाते आणि वैद्यकीय उपचारांसाठी वेळ मिळतो.