Lokmat Sakhi >Social Viral > अमेरिकन महिलेचा आगळावेगळा विश्वविक्रम...आपल्यातील कमीपणा ठासून सांगत केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...

अमेरिकन महिलेचा आगळावेगळा विश्वविक्रम...आपल्यातील कमीपणा ठासून सांगत केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...

Meet woman who set Guinness World Record for longest beard on a female : अमेरिकन महिला एरिन हनीकटने सर्वात लांब दाढी असल्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे... नेमकं काय आहे तिच्या दाढीच रहस्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 03:06 PM2023-08-18T15:06:59+5:302023-08-18T15:12:27+5:30

Meet woman who set Guinness World Record for longest beard on a female : अमेरिकन महिला एरिन हनीकटने सर्वात लांब दाढी असल्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे... नेमकं काय आहे तिच्या दाढीच रहस्य ?

A woman with PCOS broke the Guinness World Record for longest female beard. | अमेरिकन महिलेचा आगळावेगळा विश्वविक्रम...आपल्यातील कमीपणा ठासून सांगत केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...

अमेरिकन महिलेचा आगळावेगळा विश्वविक्रम...आपल्यातील कमीपणा ठासून सांगत केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास त्या आजाराच्या विचारानेच तो अर्धा खचून जातो. आपल्याला जर कोणताही गंभीर आजार झाला असेल तर आपण त्या आजाराला घाबरून त्याचे दुःख करत बसतो. माणसाला झालेल्या आजारापेक्षा 'तो आजार मलाच का झाला'? असा विचार करून माणूस खंगून जातो. अशा विचारामुळे तो व्यक्ती त्या आजारातून बाहेर येण्याऐवजी आणखीनच गुरफटत जातो. परंतु आपणच जर आपल्या या आजाराला सकारात्मक दृष्टीने विचार करत जीवनातील एक मोठे आव्हान म्हणून पाहिले व त्यावर मात करायचे ठरवले तर हे सहज शक्य होऊ शकते. 

आपल्याला झालेले हे आजारपण मिरवतच या गोष्टीचा वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book Of World Record) केल्याचे आपण कधी ऐकले आहे का ? अशीच कशीही गोष्ट अमेरिकेतील मिशिगन येथे घडली आहे. मिशिगनची रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय एरिन हनीकटने (Erin Honeycutt) सर्व सामाजिक नियम मोडीत काढून आणि वैयक्तिक आरोग्याच्या अडथळ्यांवर मात करून एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. एरिन हनीकटने (Erin Honeycutt) नेमका असा कोणता वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, ते पाहूयात(A woman with PCOS broke the Guinness World Record for longest female beard).

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.... 

एरिन हनीकट (Erin Honeycutt) ही मिशिगन येथे राहणारी ३८ वर्षीय स्त्री आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून आपली दाढी वाढवत आहे. तिची दाढी सध्या ११. ८ इंच इतकी लांब आहे. तिला इतकी लांब दाढी येण्यामागे दुसरे - तिसरे कोणतेही कारण नसून तिला झालेला हार्मोनल विकारच आहे. तिला पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम नावाचा विकार आहे ज्यामुळे शरीरातील हार्मोनल बदलांमुळे तिच्या शरीरात अतिरिक्त केस वाढतात.  

जगायचं कधी स्वत:च्या मनासारखं! - लांब केस कापून बॉय कट करणाऱ्या कीर्ती कुल्हारीचा ‘बोल्ड’ लूक...

उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

एरिन हनीकटच्या (Erin Honeycutt) वयाच्या १३ व्या वर्षापासून तिच्या हनुवटीवर केस वाढून त्याची दाढी तयार होऊ लागली. सुरुवातीला तिने तीन वेळा शेव्हिंग, वॅक्सिंग आणि केस काढण्यासाठी अनेक उपाय करायला सुरुवात केली. परंतु काही कालांतराने हाय बीपीमुळे तिला दृष्टी गमवावी लागली होती. त्यानंतर तिचा जोडीदार जेनच्या सांगण्यावरून तिने दाढी करणे बंद केले. पुढे जेनने तिला दाढी वाढवण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर हनीकटचा एक पाय बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे कापावा लागल्याची माहिती समोर येत आहे. असे असले तरीही सर्व आव्हानांना न जुमानता सकारात्मक जीवन जगण्याचा निर्णय तिने घेतला आहे. यासाठी त्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांचे आभारही व्यक्त केले आहेत. यापूर्वी विवियन नावाच्या अमेरिकन महिलेने १०.८ इंचाची दाढी वाढवून विश्वविक्रम केला होता. परंतु आता हनीकटने या ७५ वर्षीय विवियन व्हीलरचा पूर्वीचा विक्रम मोडीत काढत, लांब दाढी ठेवून गिनीज बुक ऑफ  वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of World Record) अनोख्या विक्रमाने आपले नाव नोंदविले आहे. 

अबब ! चक्क केक आणि क्रीम पासून तयार केला वेडिंग गाऊन, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद... 

पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (Polycystic Ovary Syndrome ) म्हणजे नेमकं काय ? 

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ज्याला (PCOS) 'पीसीओएस' म्हणून ओळखले जाते. हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे. याचा परिणाम अनेक किशोरवयीन मुलींवर होतो आणि पुनरुत्पादक वयातील स्त्रियांमध्ये हा सर्वात सामान्य हार्मोनल विकार आहे. अनियमित मासिकपाळी, वजन वाढणे, अंगावर तसेच हनुवटी, ओठांवर केस येणे, मानेवर काळपटपणा येणे, वंध्यत्व आणि इतर अनेक शारीरिक समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. हा हार्मोनल विकार झालयावर केसांची असामान्य रीतीने वाढ होणे हे लक्षण दिसून येते. या स्थितीत असलेल्या ७० टक्क्यांहून अधिक महिलांच्या पाठीवर, पोटावर आणि छातीसह त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केस वाढतात. केसांची जास्त वाढ होण्याला 'हर्सुटिझम' असे म्हणतात.

Web Title: A woman with PCOS broke the Guinness World Record for longest female beard.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.