कोणतंही आजारपण (illness) खूपच त्रासदायक असतं. सर्दी, ताप, खोकला किंवा फार फार तर कावीळ, मलेरिया असे आजारही ज्यापुढे क्षुल्लक वाटतील, असे काही वेगवेगळे भयानक आजार काही लोकांना असतात. असाच एक आजार सध्या लिंडसी जॉनसन (Lyndsi johnson) नावाच्या महिलेला छळतो आहे. ही महिला नेमकी कुठली, हे काही तिच्या इन्स्टाग्रामवरून कळत नाही. पण तिला झालेला आजार मात्र नक्कीच भयंकर असून त्यामुळे तिचं साेशल लाईफ, फॅमिली लाईफ, करिअर पुर्णपणे डिस्टर्ब झालं आहे, एवढं मात्र खरं.
इन्स्टाग्राम किंवा इतर काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं समजतं की २०१५ पर्यंत लिंडसी एक सर्वसामान्य आयुष्य जगत होती. तिचं सोशल लाईफ, तिचं करिअर सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. पण त्यानंतर मात्र तिला पोटदुखी आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास तिने अंगावर काढला पण त्यानंतर खूपच जास्त वेदना होऊ लागल्या. हळूहळू डोकेदुखी, उलट्या असा त्रासही सुरू झाला. या काळात तिने भरपूर डाॅक्टरांचा सल्ला घेतला, पण कुणालाही तिचे अचूक निदान करता आले नाही. त्यानंतर तर तिला चकराही येऊ लागल्या आणि त्यांचं प्रमाण वाढतच गेलं.
शेवटी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिला पोस्टुरल टैचीकार्डिया सिंड्रोम (PoTS) झालं असल्याचं समजलं. या आजाराच्या व्यक्तींना गुरुत्वाकर्षणाची ॲलर्जी असते. आता तर तिचा आजार एवढा जास्त वाढला आहे की दिवसांतून १० ते १२ वेळा ती चक्कर येऊन पडते.
गणपतीसाठीचे पेढे, मिठाई खूपच उरली? करा त्याचा असा टेस्टी उपयोग, खाणारेही होतील खुश
तिला उभं राहणं अजिबातच सहन होत नाही. उभी राहिली की जास्तीतजास्त ३ मिनिटांपर्यंत तिचा स्टॅमिना टिकतो. पण त्यानंतर मात्र ती कधीही चक्कर येऊन कोसळते. त्यामुळे दिवसातला अधिकाधिक वेळ म्हणजे अगदी २२- २३ तास तिला अंथरुणातच घालवावे लागतात. तिला जो आजार झाला आहे, त्यात व्यक्तीच्या हृदयाची गती उभं राहिल्यावर किंवा काही काम केल्यावर खूप जास्त वाढते. या आजारपणात तिचा नवरा जेम्स याची तिला चांगलीच साथ मिळते आहे. ती म्हणते की या आजारपणामुळे घराबाहेर निघणं तिच्यासाठी जवळपास अशक्य झालं आहे.