Lokmat Sakhi >Social Viral > रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल

रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल

Social Viral: आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला खाऊ घालते, त्याचप्रमाणे एक महिला एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालत  आहे. सोशल मिडियावर (social video) हा इमोशनल व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 05:54 PM2022-04-25T17:54:56+5:302022-04-25T18:00:32+5:30

Social Viral: आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला खाऊ घालते, त्याचप्रमाणे एक महिला एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालत  आहे. सोशल मिडियावर (social video) हा इमोशनल व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 

A women feeding curd rice to a street dog with lots of love, video viral on social media | रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल

रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल

Highlightsसोशल मिडियावर या माऊलीचं सध्या भरभरून कौतूक होत आहे.भटक्या कुत्र्यांना असं मायेने खाऊ घालणं, हे त्या बाई नेहमीच करत असाव्यात असंही या व्हिडिओतून स्पष्ट जाणवतं.

मुक्या प्राण्यांवर जीव ओवाळून टाकणारे आणि त्यांच्यासाठी काय वाटेल ते करणारे अनेक पेट लव्हर (pet lover) आपल्या आजूबाजुला पाहतो. त्यांच्याबद्दल ऐकून माहिती असणं वेगळं आणि त्यांच्या कामाचं स्वरुप प्रत्यक्ष अनुभवणं, पाहणं हे खूप खूप वेगळं. म्हणूनच तर सोशल मिडियावर सध्या अशाच एक पेट लव्हर माऊलीचा व्हिडिओ गाजतो आहे...

 

व्हिडिओमध्ये त्या बाईंच्या आजुबाजुला जे काही दिसतं आहे, त्यावरून तर ते ठिकाण पश्चिम बंगालमधील (West Bengal) असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एक मध्यमवयाची महिला दिसत आहे. रेल्वेस्टेशनवर अगदी पद्धतशीर त्या मांडी घालून बसल्या आहेत. सोबत त्यांनी दही भात आणला आहे आणि एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला त्या खाऊ घालत आहेत. खाताना एखाद्या लहान मुलाप्रमाणे कुत्रा मान वळवून घेतानाही दिसतो आहे. पण त्याला प्रेमाने ओंजारत गोंजारत, आपल्या हाताने त्याचं तोंड उघडत ही महिला त्याला खाऊ घालते आहे..

 

व्हिडिओ पाहून असं दिसत आहे की ते कुत्र काही तिचं पाळीव कुत्र नाही. कारण पाळीव कुत्र्याच्या गळ्यात सामान्यपणे एक बेल्ट दिसून येतो, तो या कुत्र्याच्या गळ्यात नाही. शिवाय या व्हिडिओतून असंही जाणवतं की या कुत्र्याची आणि त्या महिलेची ही काही पहिलीच भेट नाही. त्यांची एकमेकांशी चांगलीच गट्टी जाणवते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना असं मायेने खाऊ घालणं, हे त्या बाई नेहमीच करत असाव्यात असंही या व्हिडिओतून स्पष्ट जाणवतं. सोशल मिडियावर या माऊलीचं सध्या भरभरून कौतूक होत आहे.

 

Web Title: A women feeding curd rice to a street dog with lots of love, video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.