सोशल मिडियावरचे काही काही व्हिडिओ (viral video) खरोखरंच खूप मजेशीर असतात. ताण कमी करण्यासाठी, मन फ्रेश करण्यासाठी हे व्हिडिओ मस्त उपयोगी ठरतात. असे जरा गमतीदार विषयांचे हलके- फुलके व्हिडिओ पाहिले की मग आपणही रिलॅक्स होऊन जातो. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओही अगदी तसाच आहे. catsdoingthings या इन्स्टाग्राम (instagram share) पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे (cat in a baby kicking video).
आपल्या होणाऱ्या बाळाच्या हालचाली अनुभवणे हा प्रत्येक आईसाठी एक सुरेख अनुभव असतो. बाळ जेव्हा पोटात हालचाल करत असते, तेव्हा तो अनुभव आपल्यासह घरातल्या आपल्या इतर जवळच्या मंडळींनाही द्यावा, असंही अनेकजणींना वाटत असतं. तसंच या एका आईलाही वाटत होतं. म्हणूनच बाळाची पोटात हालचाल होत असताना ती पोटाच्या वरून कशी जाणवते, याचं शुटिंग करण्याचा तिचा विचार होता.
त्यानुसार तिने शुटिंग करायचं ठरवलं. कॅमेरा स्वत:च्या हातात धरून पोटावर सेट केला आणि बाळाच्या हालचाली जाणवण्याची ती वाट बघू लागली. पण तेवढ्यात त्या महिलेच्या घरातली पाळीव मांजर टुणकन उडी मारून तिच्या पोटावर येऊन बसली आणि सगळाच बेत फसला.
बाळ कसं हालचाल करतं, याचा व्हिडिओ तर दूरच राहिला, मग या मनीमाऊचं शुटिंगच त्या आईला घ्यावं लागलं. "You are not allowed to replace me (Tiktok: alyssadishmon)" असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. बऱ्याच जणांना ती मांजर आणि ती महिला यांच्यातलं प्रेम खूप आवडलं आहे. पण त्याचवेळी अनेकांनी त्या होणाऱ्या आईलाही सल्ला दिला आहे की गरोदरपणी असं मांजरीनं पोटावर उडी मारणं आणि चालणं हे काही बरं नव्हे.. त्यामुळे काळजी घे, अशी सूचनाही तिला अनेकांनी केली आहे.