बॉक्स हिल्सचा वापर एकवेळ सोपा असतो. पण पेन्सिल हिल्स (women jumping on a rope wearing pencil heels) घालून वावरायचे म्हटले की अनेक जणींना जाम टेन्शन येते. पेन्सिल हिल्स घालून भराभरा चालणेही अनेकींना शक्य नसते.. त्यात जर एखादी तरूणी पेन्सिल हिल्स घालून उड्या मारत असेल आणि ते देखील एका दोरीवर, तर आहे की नाही कमाल... म्हणून तर या तरूणीची नोंद थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. guinnessworldrecords या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. ओल्गा हेनरी असं रेकॉर्ड करणाऱ्या महिलेचं नाव आहे. Most bum bounces in high heels on a slackline in one min... अशा पद्धतीचा रेकॉर्ड तिच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. कॅलिफॉर्निया येथील सांता मोनिका बीच येथे तिने हा जबरदस्त स्टंट केला आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की दोन्ही खांबाला एक दोरी बांधली आहे. ओल्गा हेनरी हिने पांढऱ्या रंगाच्या पेन्सिल हिल्स घातल्या आहेत आणि ती दोरीवर bum bounce या प्रकारातल्या उड्या मारत आहे. दोरीवर बसून स्वत:चा तोल सावरायचा, पुन्हा उठायचे आणि दोरीवर उभे राहून पुन्हा स्वत:ला सांभाळायचे, ही कसरत खरोखरंच कमालीची आहे.. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यावर खरोखरंच बघणारा अवाक होतो आणि शेवटपर्यंत तिचा व्हिडिओ पाहतो. तब्बल १० bum bounce तिने केल्या आहेत.