Lokmat Sakhi >Social Viral > स्कुटी सुसाट आणि बाइकवाल्याला ताप! सुसाट स्कुटीवरच्या तरुणीनं बाईकवाल्याला ठोस मारली आणि...

स्कुटी सुसाट आणि बाइकवाल्याला ताप! सुसाट स्कुटीवरच्या तरुणीनं बाईकवाल्याला ठोस मारली आणि...

Viral Video चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच, भरधाव वेगाने स्कुटी घेऊन आली अन् बाईकला जाऊन धडकली, वर बाईकस्वारालाच ओरडली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 02:10 PM2022-11-24T14:10:38+5:302022-11-24T14:17:12+5:30

Viral Video चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच, भरधाव वेगाने स्कुटी घेऊन आली अन् बाईकला जाऊन धडकली, वर बाईकस्वारालाच ओरडली..

A young woman on a scooter hits a biker and starts to yelling that biker.. | स्कुटी सुसाट आणि बाइकवाल्याला ताप! सुसाट स्कुटीवरच्या तरुणीनं बाईकवाल्याला ठोस मारली आणि...

स्कुटी सुसाट आणि बाइकवाल्याला ताप! सुसाट स्कुटीवरच्या तरुणीनं बाईकवाल्याला ठोस मारली आणि...

सोशल मीडियात रॅश ड्रायव्हिंगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातही ‘पापा की परी’ म्हणत स्कुटी चालवत धडकणाऱ्या अनेक तरुणींचे व्हिडिओ तर हमखास टिंगलीचा विषय होतात. असे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कोणतीतरी महिला स्कुटी चालवत असताना गोंधळते आणि पडते. खरंतर अशा अनेक महिला आहेत ज्या स्कुटीसह बाईक देखील एका बाईकरायडरप्रमाणे उत्तम चालवतात. मात्र जरा काही गडबड झाली की व्हिडिओ व्हायरल होतातच. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.

एक तरुणी भरधाव वेगाने स्कुटी चालवत येत आहे. एक तरुण रस्त्याच्या कडेला बाईकवर बसलेला असतो. ती तरुणी भरधाव वेगाने स्कुटी घेऊन येते आणि तिचा स्कुटीवरून तोल जातो. आणि तिची स्कुटी थेट बाईकला पाठीमागून धडकते. स्कुटीची टक्कर बसताच बाईकवर बसलेला तरुण खाली पडतो. यानंतर जे घडलं ते पाहून तुमचं हसू अनावर होणार आहे.

कारण ती तरुणी त्या बाईकस्वाराला उचलायचे सोडून त्याच्यावरच चिडते. ''आंधळा आहेस का, तुला बाईक नीट चालवता येत नाही का ?''. असे म्हणत तिचा दोष ती त्याच्यावर ढकलते. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ videonation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत हा व्हिडिओ तुफान व्हायरल केला आहे.

Web Title: A young woman on a scooter hits a biker and starts to yelling that biker..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.