Lokmat Sakhi >Social Viral > लेकीसाठी आमिर खान बनला मेकअप आर्टीस्ट, लोक म्हणाले वाह परफेक्शनिस्ट! पाहा फोटो

लेकीसाठी आमिर खान बनला मेकअप आर्टीस्ट, लोक म्हणाले वाह परफेक्शनिस्ट! पाहा फोटो

वडिलांनी प्रेमाने केलेल्या गोष्टीमुळे इरा खूश होणारी इरा आणि या दोघांचे एकमेकांशी असणापे बाँडींग आपल्याला या फोटोंमध्ये दिसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 03:27 PM2022-04-28T15:27:58+5:302022-04-28T15:32:31+5:30

वडिलांनी प्रेमाने केलेल्या गोष्टीमुळे इरा खूश होणारी इरा आणि या दोघांचे एकमेकांशी असणापे बाँडींग आपल्याला या फोटोंमध्ये दिसते

Aamir Khan became a makeup artist for daughter, people said wow perfectionist! See photo | लेकीसाठी आमिर खान बनला मेकअप आर्टीस्ट, लोक म्हणाले वाह परफेक्शनिस्ट! पाहा फोटो

लेकीसाठी आमिर खान बनला मेकअप आर्टीस्ट, लोक म्हणाले वाह परफेक्शनिस्ट! पाहा फोटो

Highlightsपाहा आमिर खानचे त्याच्या मुलीशी असणारे खास बाँडींगमिस्टर परफेक्शनिस्टमधला बाप जेव्हा मुलीचा मित्र होतो, तेव्हा...

आमिर खानची मुलगी इरा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. कधी तिच्या रिलेशनशिपविषयी तर कधी तिला येत असलेल्या नैराश्याविषयी ती सोशल मीडियावर भरभरुन व्यक्त होत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स असून आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी ती बिनधास्तपणे या माध्यमातून व्यक्त करताना दिसते. इरा आमिर खान याची पहिली पत्नी रीना हिची मुलगी आहे, वडिलांसोबत तिचे अतिशय मित्रत्वाचे नाते असल्याचे तिच्या काही पोस्टमधून नेहमी समोर येते. नुकतीच तिने आमिर खानसोबतची एक पोस्ट शेअर केली असल्याने या दोघांबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

तर इराने आता केलेल्या पोस्टमध्ये तिचे आणि आमिरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कॅप्शन देताना ती, सांगा माझा मेकअप कोणी केला असेल असा प्रश्न विचारते. पुढे ती म्हणते, आपल्या वडिलांनी आपल्याकडे येऊन ते स्वत: माझ्यापेक्षा माझा जास्त छान मेकअप करु शकतात हे सांगणे किती इंटरेस्टींग आहे. त्यांनी मला परफेक्ट तयार केले आहे, अशावेळी युट्यूबवरुन या मेकअप शिकण्याची काय गरज आहे असा प्रश्नही ती उपस्थित करते. आमिरने केलेल्या मेकअपमुळे इरा खरंच सुंदर दिसत असल्याचे आपल्याला फोटोमध्येही दिसते. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट या बाबतीतही मागे नाही असे म्हणायला हवे.

यातील एका फोटोमध्ये इराने अमिर खानला तिचा हेअरबँड लावला असून हे दोघे एकमेकांशी मस्ती करताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांचे नाते खेळीमेळीचे असल्याचे दिसते. काही तासांत इराच्या या पोस्टला २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी या दोघांच्या बाँडविषयी त्यांचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इरा बऱ्याचदा आमिरसोबतच्या तिच्या खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच्या त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इराने त्याच्यासोबतचा तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे मुलीसाठी बाबा हे सर्वस्व असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

Web Title: Aamir Khan became a makeup artist for daughter, people said wow perfectionist! See photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.