ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन (Aishwarya and Abhishek Bachchan) यांची लाडकी लेक आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते. जे काही स्टार किड्स नेहमीच चर्चेचा विषय असतात, त्यापैकी एक आहे आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan). कधी तिच्या इंग्रजी बोलण्याची चर्चा होते तर कधी तिचं ड्रेसिंग आणि मोठ- मोठ्या कार्यक्रमांमधून तिचा असणारा सहज वावर, तिचे पार्टी लूक्स हा चर्चेचा विषय ठरतो. एवढंच काय तिचं स्वत:चं आई ऐश्वर्यासोबतचं एक खास इन्स्टाग्राम पेज असून त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. यावरून तिची लोकप्रियता दिसून येते. आता आराध्याच्या आणखी एका गोष्टीची अशीच जबरदस्त चर्चा सोशल मिडियावर (viral on social media) रंगली आहे.
त्याचं झालं असं की colorstv ने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. IIFA- 2022 चा हा दिमाखदार सोहळा आहे. सोहळ्याचं प्रक्षेपण अजून काही दिवसांनी होणार आहे. तर या सोहळ्यात अभिषेकने एका गाण्यावर तुफान डान्स केला. अर्थात अभिनेता म्हणून अभिषेकने नुकतेच पदार्पण केले होते, तेव्हा त्याच्या नृत्य करण्यावर अनेक जणांनी भरपूर टिका केली होती. पण नंतर मात्र प्रत्येक चित्रपटागणिक त्याने स्वत:ला इंम्प्रुव्ह केलं.. आता तो खरोखरंच बहारदार नृत्य करतो. तर अशाच प्रकारचा धमाकेदार डान्स त्याने या सोहळ्यात केला.
त्याचा हा डान्स एवढा एनर्जेटिक होता की तो पाहून समोरच्या रांगेत बसलेली त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांच्यासह अनेक प्रेक्षकांनीही ठेका धरला होता. अभिषेकचा हा धमाकेदार परफॉर्मन्स संपल्यानंतर स्टार निवेदक मनिष पॉल यांनी आराध्याला ''डॅड का परफॉर्मन्स कैसा लगा?'', असा प्रश्न विचारला. त्यावर आराध्याने जे उत्तर दिलं ते ऐकून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या प्रश्नावर उत्तर देताना आराध्या म्हणाली "It wasvery very very very very very beautiful''. मुलीकडून आलेली ही कौतूकाची पावती पाहून अभिषेक आणि ऐश्वर्याही चांगलेच हरखून गेले होते.