Join us  

रस्त्यावरची पाणीपुरी खाणं पडेल महागात, FSSAI चा अभ्यास सांगतो- पाणीपुरीमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2024 5:34 PM

Cancer Causing Chemicals Found In Panipuri : रस्त्यावरची पाणीपुरी खाणं तुम्हालाही आवडत असेल तर एकदा फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI यांनी दिलेला अहवाल काय सांगतो ते एकदा वाचाच.. 

ठळक मुद्देसंपूर्ण कर्नाटकातून एकून २६० ठिकाणच्या पाणीपुरीचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी ४१ नमुने असुरक्षित ठरले.

पाणीपुरी म्हणजे बहुसंख्य भारतीयांचं अतिशय आवडीचं स्ट्रीटफूड. तिचं नुसतं नाव जरी घेतलं तरी लगेच तिचा सुवास नाकात दरवळायला लागतो आणि तोंडाला पाणी सुटतं. तुमचंही असंच होत असेल आणि तुम्हीही नेहमीच पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन मनसोक्त पाणी पुरी फस्त करत असाल तर FSSAI ने दिलेला अहवाल एकदा वाचाच. असं वारंवार रस्त्यावरची पाणीपुरी खाणं महागात पडू शकतं. कारण FSSAI ने केलेल्या पाहणीनुसार काही पाणीपुरीच्या नमुन्यांमध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक आढळून आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरची पाणीपुरी खाण्याआधी थोडं थांबून नक्की एकदा विचार करा.. (cancer causing chemicals found in panipuri)

 

डेक्कन हेराल्ड यांच्या रिपोर्टनुसार FSSAI तर्फे कर्नाटकमध्ये मिळणाऱ्या पाणीपुरीचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असं आढळून आलं आहे की तपासलेल्या नमुन्यांपैकी २२ टक्के नमुने खाण्यायोग्य नव्हते.

अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

संपूर्ण कर्नाटकातून एकून २६० ठिकाणच्या पाणीपुरीचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी ४१ नमुने असुरक्षित ठरले. कारण त्यांच्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर तर केलेला होताच, पण कॅन्सर निर्माण करणारे घटकही त्यात सापडले.

 

ब्रिलिंयंट ब्लू, सनसेट येलो, टाट्रार्जिन असे हानिकारक केमिकल्सही त्या नमुन्यांमध्ये आढळून आले. या ४१ नमुन्यांव्यतिरिक्त इतर १८ नमुने निकृष्ठ दर्जाचे आहेत, असं जाहीर करण्यात आलं.

कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

त्यामुळे कितीही आवडत असली तरी पाणीपुरी खाण्याआधी वरील गोष्टींचा विचार एकदा नक्की करा. कारण त्या अहवालानुसार पाणीपुरी हा खाण्यासाठी काही सुरक्षित खाद्यपदार्थ  नाही, असं सांगण्यात आलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नआरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग