Lokmat Sakhi >Social Viral > सुंदर महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुष खाऊन जातात भाव- भराभर करतात प्रगती, बघा संशोधन काय सांगतं....

सुंदर महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुष खाऊन जातात भाव- भराभर करतात प्रगती, बघा संशोधन काय सांगतं....

Research About Handsome Men And Beautiful Women: सुंदर दिसणाऱ्या महिला करिअरमध्ये झटपट प्रगती करून पुढे जातात, असं म्हटलं जातं. पण असं नाहीये... बघा याविषयीचं संशोधन काय सांगतं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2024 01:12 PM2024-02-06T13:12:35+5:302024-02-06T13:13:21+5:30

Research About Handsome Men And Beautiful Women: सुंदर दिसणाऱ्या महिला करिअरमध्ये झटपट प्रगती करून पुढे जातात, असं म्हटलं जातं. पण असं नाहीये... बघा याविषयीचं संशोधन काय सांगतं....

According to research good looking men get more carrier opportunities than beautiful women | सुंदर महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुष खाऊन जातात भाव- भराभर करतात प्रगती, बघा संशोधन काय सांगतं....

सुंदर महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुष खाऊन जातात भाव- भराभर करतात प्रगती, बघा संशोधन काय सांगतं....

Highlightsसुंदर दिसणाऱ्या महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुषांना करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी अधिक लवकर मिळतात, असं सिद्ध झालं आहे.

महिला असो किंवा मग पुरुष असो. दोघेही आपापल्यापरीने करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी झटत असतात. पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण बऱ्याचदा महिलांच्या बाबतीत असं बोललं जातं की ज्या महिला दिसायला सुंदर असतात, त्यांना पुढे जाण्याची संधी भराभर मिळते आणि त्या करिअरमध्ये अधिक यशस्वी होतात. महिलांच्या बाबतीत पुरुषच असं बोलतात, असं नाही. यात इतर महिलाही अग्रेसर आहेतच. पण हे म्हणणं साफ चुकीचं असून सुंदर दिसणाऱ्या महिलांपेक्षा हॅण्डसम पुरुषांना करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी अधिक लवकर मिळतात, असं सिद्ध झालं आहे. बघा हे सर्व्हेक्षण नेमकं कुणी केलं आणि त्याचे काय निष्कर्ष आहेत... (According to research good looking men get more carrier opportunities than beautiful women)

 

१९९३ साली ओस्लो विश्वविद्यालय आणि पोलिश ॲकेडमी ऑफ सायन्स येथील दोन विद्यार्थ्यांनी याविषयीचा अभ्यास सुरू केला हाेता. तब्बल २० वर्षे त्यांनी जवळपास ११ हजार अमेरिकी व्यक्तींचा अभ्यास केला.

पोटावरचे टायर्स कमीच होत नाहीत? करिना कपूर सांगतेय तो व्यायाम करा- पोट होईल सपाट 

यामध्ये त्यांना असं आढळून आलं की आकर्षक महिलांच्या तुलनेत आकर्षक दिसणाऱ्या पुरुषांना चांगली नोकरी मिळविण्याची, प्रगती करण्याची तसेच पैसे कमाविण्याची संधी जास्त मिळत गेली. त्यांनी या सर्व्हेक्षणात ज्या यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला, ते त्यांच्या तरुणवयात अतिशय आकर्षक म्हणून ओळखले जायचे.

 

या अभ्यासानुसार असंही आढळून आलं आहे की ज्या महिला अधिक देखण्या आहेत, त्यांना इतर महिलांच्या तुलनेत जास्त संधी मिळाल्या. पण त्यांना मिळालेल्या संधी, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये केलेली प्रगती तसेच त्यांना मिळणारा पैसा आकर्षक पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

वाढदिवसाच्या केकची लावली वाट! ऑनलाईन डिलिव्हरी करताना त्यावर भलतंच लिहून पाठवलं आणि मग.....

अनेक कपंन्यांमध्ये उच्च पदासाठी सुंदर महिलांपेक्षा आकर्षक पुरुषांनाच अधिक संधी दिल्या जातात. एवढंच नाही तर आाकर्षक असणं हे महिलांसाठी एक वीकपॉईंट तर पुरुषांसाठी एक स्ट्राँग पॉईंट मानला जातो, असंही या सर्व्हेक्षणात म्हटलं आहे. 
 

Web Title: According to research good looking men get more carrier opportunities than beautiful women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.