Lokmat Sakhi >Social Viral > "मी तैमूरला सांभाळतो, करिना शूटिंगला गेली आणि..", सैफ सांगतो शर्मिला टागोर यांनी दिलेल्या शिकवणुकीविषयी..

"मी तैमूरला सांभाळतो, करिना शूटिंगला गेली आणि..", सैफ सांगतो शर्मिला टागोर यांनी दिलेल्या शिकवणुकीविषयी..

Viral Video of Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या या स्टेटमेंटमागचं जे कारण दिलं आहे, ते खरं तर सगळ्याच वर्किंग वुमनच्या  (working women) नवऱ्याने आणि मुलाने ऐकायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 06:26 PM2022-10-19T18:26:13+5:302022-10-19T18:27:16+5:30

Viral Video of Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या या स्टेटमेंटमागचं जे कारण दिलं आहे, ते खरं तर सगळ्याच वर्किंग वुमनच्या  (working women) नवऱ्याने आणि मुलाने ऐकायला हवं.

Actor Saif Ali Khan Says.. this is the reason why I am looking after Taimur, while Kareena shoots in London | "मी तैमूरला सांभाळतो, करिना शूटिंगला गेली आणि..", सैफ सांगतो शर्मिला टागोर यांनी दिलेल्या शिकवणुकीविषयी..

"मी तैमूरला सांभाळतो, करिना शूटिंगला गेली आणि..", सैफ सांगतो शर्मिला टागोर यांनी दिलेल्या शिकवणुकीविषयी..

Highlightsअतिशय इमोशनल असलेला हा व्हिडिओ एक व्यक्ती म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून किंवा आजी म्हणून शर्मिलाजींच्या वेगवेगळ्या गुणांवर प्रकाश टाकणारा ठरला. 

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (The veteran actress Sharmila Tagore ) यांचा मुलगा म्हणजे अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan). शर्मिला टागोर यांनी नुकत्याच एका रिॲलिटी शो मध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्यासाठी केलेला एक व्हिडिओ दाखविण्यात आला. सैफ अली खान, सोहा अली खान, सुनबाई करिना कपूर (Kareena Kapoor) अशा सगळ्यांनीच त्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Saif Ali Khan and Sharmila Tagore) शर्मिलाजींबाबत भावना व्यक्त केल्या होत्या. अतिशय इमोशनल असलेला हा व्हिडिओ एक व्यक्ती म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून किंवा आजी म्हणून शर्मिलाजींच्या वेगवेगळ्या गुणांवर प्रकाश टाकणारा ठरला. 

 

या व्हिडिओमध्ये आपल्या आईबाबत भावना व्यक्त करताना अभिनेता सैफ अली खान म्हणाला की आई नेहमीच शुटिंगमध्ये व्यस्त असायची. पण ती तिचं काम आणि कुटूंब एवढं व्यवस्थित सांभाळायची की आम्हाला तिची कमी कधीच जाणवायची नाही.

पणत्यांमधून तेल गळू नये म्हणून २ सोपे उपाय, तेलाची बचत आणि फरशीही राहील स्वच्छ

लग्नानंतरही तिने यशस्वी करिअर करून दाखवलं. ती आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा तर आहेच, पण प्रत्येक वर्किंग वुमनसाठीही आदर्श आहे. वर्किंग वुमनचा आणि तिच्या कामाचा आदर कसा करायचा, हे ही आम्ही आईकडूनच शिकलो. म्हणूनच तर आज करिना शुटिंगसाठी लंडनला गेली आहे आणि मी इथे तैमूरची देखभाल करत आहे.

 

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री करिना कपूर हिनेही सासुबाई शर्मिला टागोर यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते की त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं, तेवढं कमीच आहे.

अनन्या पांडेचा ५५ हजारांचा एथनिक- फेस्टिव्ह ड्रेस! तिच्या झगमग ड्रेसची व्हायरल चर्चा

जेव्हाही मी त्यांच्याकडे बघते तेव्हा प्रेम आणि एकता या दोनच गोष्टी मला दिसतात. आई- सासू- आजी म्हणून प्रत्येक नात्यामध्ये त्या परफेक्ट आहेत. त्यांचा सहवास मिळतो, त्याबाबत करिना स्वत:ला भाग्यवान मानते. या व्हिडिओमध्ये शर्मिला यांच्या लेकींनीही त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. 

 

Web Title: Actor Saif Ali Khan Says.. this is the reason why I am looking after Taimur, while Kareena shoots in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.