Join us  

"हा क्षण आयुष्यात वारंवार थोडीच येणार आहे...", ट्रोलर्सला बिपाशाने दिले सडेतोड उत्तर, बघा का होतेय ती ट्रोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 2:23 PM

Bipasha Basu's answer to trolls: गरोदर असणारी अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) सध्या चांगलीच ट्रोल होत आहे. बघा नेमकं काय कारण आहे तिच्या ट्रोलिंगचं....

ठळक मुद्देतिच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल आणि कपड्यांच्या चॉईसबद्दल तिच्यावर भरपूर तोंडसूख घेतले जात आहे. यामुळे ती वैतागली असून तिने तिच्यावर टिका करणाऱ्या ट्रोलर्सला आता मात्र चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. 

मागील काही वर्षांपासून बिपाशा बसू (Bipasha Basu) तशी बॉलीवूडपासून (bollywood) लांबच आहे. आणि आता तर पुढचे एखादे वर्ष तरी ती चित्रपटांपासून दूरच राहणार. कारण सध्या ती गरोदर (pregnancy) असून तिने नुकतेच तिचे प्रेग्नन्सी फोटोशूटचे ( maternity photo shoot) काही फोटो सोशल मिडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यामुळे गरोदरपण आणि बाळाचं लहानपण तिला मनापासून एन्जॉय करायचंय, असं तिने नुकतंच मागे झालेल्या एका मुलाखतील सांगितलं होतं. काही दिवसांपुर्वी प्रेग्नन्सीमुळे चर्चेत असणारी बिपाशा आता मात्र वेगळ्याच कारणांमुळे ट्रोलर्सच्या रडारवर आली आहे.(Actress Bipasha Basu is getting troll )

 

बिपाशा आणि तिचा नवरा करणसिंग ग्रोव्हर यांनी केलेल्या प्रेग्नन्सी फोटोशूटचे फोटो काही दिवसांपुर्वी व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये बिपाशाचा लूक अतिशय हॉट असून तिने त्यात पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातलेला आहे. तेवढेच कपडे तिच्या अंगावर दिसत आहेत. नेमक्या याच कारणामुळे ती सध्या ट्रोल होत आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल आणि कपड्यांच्या चॉईसबद्दल तिच्यावर भरपूर तोंडसूख घेतले जात आहे. यामुळे ती वैतागली असून तिने तिच्यावर टिका करणाऱ्या ट्रोलर्सला आता मात्र चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. 

 

इ- टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बिपाशा म्हणते आहे की प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण मला त्या कमेंट्सपैकी १ टक्का निगेटिव्ह कमेंटपेक्षा ९९ टक्के पॉझिटीव्ह असलेल्या कमेंटवर लक्ष केंद्रित करायला आवडते. ती म्हणते की तुम्हाला तुमचे शरीर जसे असेल तसे आवडायला पाहिजे. मला माझे शरीर आवडते आणि सध्या तरी माझे पोट हेच माझ्या बाळाचे घर आहे. हा क्षण आयुष्यात वारंवार थोडीच येणार आहे. त्यामुळे मला माझा आजचा क्षण एन्जॉय करायचा आहे. त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि मुळात आम्ही शेअर केलेले फोटो हे आमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या चाहत्यांसाठी आहेत, असं म्हणत तिने ट्रोलर्सला चांगलंच फटकारलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलबिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हरप्रेग्नंसीट्रोल