अभिनेत्री प्रेग्नंट असल्या की त्यांच्या कुटूंबियांइतकीच त्यांची काळजी त्यांच्या चाहत्यांनाही असते. त्यामुळेच तर गरोदर असलेल्या अभिनेत्रींनी काय खावं, काय खाणं टाळावं, कसे कपडे- चपला वापराव्यात, याविषयीच्या अनेक प्रेमभऱ्या सूचना त्यांना त्यांच्या चाहत्यांकडूनही मिळत असतात. तसंच आता बिपाशाचं (Bipasha Basu's pregnancy) झालं आहे. काही दिवसांपुर्वी बिपाशाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात तिने कफ्तान कुर्ती आणि त्यावर हाय हिल्स (high heels in pregnancy) घातल्या होत्या. बिपाशाचा तो फोटो पाहून तिच्या चाहत्यांना भयंकर राग आला आणि प्रेग्नन्सीमध्ये अशा प्रकारच्या हिल्स घालणं किती धोकादायक आहेत, याविषयीच्या बऱ्याच कमेंट्स (trolling) तिला मिळाल्या..
प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घालून फिरणारी बिपाशा या प्रकरणामुळे चांगलीच ट्रोल झाली होती. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिलादेखील याच विषयावरून ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता.
शिळ्या पोळ्यांचा टेस्टी पदार्थ, फक्त दहा मिनिटांत होणारा रोटी सामोसा! चवीला मस्त आणि पोळ्याही संपतील
तिचे हाय हिल्समधले काही फोटो व्हायरल झाले आणि ते पाहून तिचे चाहते चांगलेच चिडले होते. आलियाने यावरून धडा घेतला आणि मागच्या दोन- तीन दिवसांपुर्वी तिचे प्रेग्नन्सीसाठी योग्य ठरतील अशा चपला घातल्याचे फोटो व्हायरल झाले. आता आलियाच्या पाठोपाठ बिपाशाचेही काही फोटो व्हायरल झाले असून यामध्ये तिने हायहिल्स ऐवजी गोल्डन रंगाचे फ्लॅट स्निकर्स घातले आहेत. ते पाहून तिचे चाहते चांगलेच सुखावले.
बिपाशाने नुकतेच तिचे फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले असून यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा कफ्तान कुर्ता घातला आहे.
"सपने मे मिलती है...", नवरा- नवरीने केला लग्नमंडपातच सत्या स्टाइल दणक्यात डान्स, व्हायरल व्हिडीओ
तिने ट्रोलर्सला अतिशय सकारात्मकतेने घेतले असून त्यानुसार लगेच तिच्या फूटवेअरमध्ये बदल केला. मसाबा गुप्ता हिने डिझाईन केलेल्या पिवळ्या कुर्त्यावर बिपाशाने सोनेरी आणि पांढरे अशी रंगसंगती असणारे स्निकर्स घातले आहेत. "mama can's wear heels no more...", अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.