Join us  

कोरोनानंतर डाऊन? खूप थकल्यासारखं वाटतं? हिना खान सांगतेय तिचा अनुभव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 5:07 PM

Social viral: कोरोना झाल्यानंतर अभिनेत्री हिना खान हिलाही खूप थकवा आला होता.. खूप डाऊन झाली होती ती.. कोरोना होऊन गेल्यानंतर तुमचीही अशीच अवस्था झाली असेल तर यातून बाहेर पडण्याचा उपाय सांगते आहे हिना खान...

ठळक मुद्देअसाच सगळा त्रास हिनालाही झाला होता.. बघा यातून बाहेर पडण्यासाठी तिनं नेमकं काय केल ते...

सध्या कोरोनाची (corona) खूप जास्त साथ चालू आहे.. प्रत्येक घरात एखाद- दुसरा पेशंट तरी आहेच आहे.. पहिल्या-  दुसऱ्या लाटेत होती एवढी कोरोनाची (COVID 19) भीती आता वाटत नाही, हे खरेच आहे.. पण तरीही कोरोना झालेला  असताना आणि त्यानंतर होणारा त्रास तर तोच आहे.. या त्रासातून बाहेर येऊन पुन्हा आपलं नॉर्मल रुटीन सुरू करणं अनेकांना कठीण होत आहे.. कुठून आणि कशी सुरुवात करावी, हेच कळत नाही. म्हणूनच तर यावरचा उपाय सांगते आहे अभिनेत्री हिना खान (Actress Hina Khan). 

 

कोरोना आणि इतर आजारा यामधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे आयसोलेशन किंवा विलगीकरण.. कोरोना (third wave of corona) झाला आहे असं म्हटल्यावर लगेचच कोरोना रूग्णांना स्वत:ला इतरांपासून वेगळं करून घ्यावं लागतं.. आयसोलेशनमध्ये असताना बऱ्याच रूग्णांना खूप जास्त एकटेपणा वाटतो. यातून अनेकांना डिप्रेशन येतं. जगापासून आपण तुटलो आहोत, आपला कनेक्ट तुटला आहे, असं काहीसं वाटू लागतं. या त्रासाव्यतिरिक्त कोरोना झाल्यानंतर अनेक जणांना खूप जास्त विकनेस जाणवतो.. कोरोना नंतरच्या डोकेदुखीनेही अनेक जण हैराण झाले आहेत. असाच सगळा त्रास हिनालाही झाला होता.. बघा यातून बाहेर पडण्यासाठी तिनं नेमकं काय केल ते...

 

हिना खान म्हणजे छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचा एक तगडा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळेच तर हिनाच्या सोशल मिडियावरच्या प्रत्येक पोस्टला तिच्या चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असतो. हिनालाही नुकताच कोरोना होऊन गेला. या काळात तिला तिच्या कुटूंबाची तर खूप जास्त आठवण तर येतच होती पण सोबतच तिला खूप जास्त थकवा, डोकेदुखी असा त्रासही होत होता. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिने हळूहळू प्रयत्न सुरु केले.. तिने नेमके कसे आणि काय प्रयत्न केले हे तिने एका व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. कोरोनातून बाहेर येण्यासाठी हिनाचा हा व्हिडिओ म्हणजे एक प्रेरणा असल्याचे तिच्या अनेक चाहत्यांना वाटते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकोरोना वायरस बातम्याहिना खान