Lokmat Sakhi >Social Viral > शुटिंगच्या सेटवर मेकअप करताना काजोलच्या हातात लोकर आणि सूया! खरंच विणकाम स्ट्रेस कमी करते?

शुटिंगच्या सेटवर मेकअप करताना काजोलच्या हातात लोकर आणि सूया! खरंच विणकाम स्ट्रेस कमी करते?

Actress Kajol Waving Wool While Doing Makeup Viral Video : मेकअप करतानाचा हा काही मिनीटांचा वेळही काजोल वाया घालवत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 03:21 PM2023-02-16T15:21:08+5:302023-02-16T16:26:06+5:30

Actress Kajol Waving Wool While Doing Makeup Viral Video : मेकअप करतानाचा हा काही मिनीटांचा वेळही काजोल वाया घालवत नाही.

Actress Kajol Waving Wool While Doing Makeup Viral Video : Kajol preserves her passion while doing makeup; Watch the exclusive video she shared | शुटिंगच्या सेटवर मेकअप करताना काजोलच्या हातात लोकर आणि सूया! खरंच विणकाम स्ट्रेस कमी करते?

शुटिंगच्या सेटवर मेकअप करताना काजोलच्या हातात लोकर आणि सूया! खरंच विणकाम स्ट्रेस कमी करते?

आपल्या प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. हा छंद जोपासला तर आपण रोजच्या धावपळीतून रिलॅक्स होतो आणि आपल्याला आपल्या आवडीची गोष्ट केल्याचा आनंदही मिळतो. रोजच्या धबडग्यात आपल्याला या छंदासाठी वेळ काढायला मिळतोच असे नाही. मग कधी आपण आवर्जून या छंदासाठी वेळ काढतो तर कधी दुसरं काहीतरी करताना छंद जोपासतो. आपल्याबाबत जे होते तेच अभिनेत्रींबाबतही होण्याची शक्यता असते. बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री काजोल हिने नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

आपल्या इन्स्टाग्रामवर काजोलने हा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये काजोल आरशासमोर बसल्याचे दिसते. तिची मेकअप आर्टीस्ट तिचा मेकअप करत असून हेअर स्टायलिस्ट तिची हेअरस्टाईल करत असल्याचे दिसते. मात्र मेकअप करतानाचा हा काही मिनीटांचा वेळही काजोल वाया घालवत नाही. तर आपल्या आवडीचे लोकरीचे काम ती यावेळी करताना दिसते. एखादी ज्येष्ठ महिला ज्याप्रमाणे अतिशय तरबेज असल्याप्रमाणे सुयांकडे न पाहता लोकरीचे कपडे दोन सुयांवर विणते. त्याचप्रमाणे काजोलही अतिशय सहज दोन सुयांवर हे लोकरीचे काम करताना दिसते. ही लोकर ऑफव्हाईट रंगाची असून ती नेमके काय विणते आहे याचा अंदाज मात्र आपल्याला लावता येत नाही. 

मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेत्री आणि केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनीही असाच लोकरीचे काहीतरी विणण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावेळी त्या ट्रॅफिक जाममध्ये अडकल्या होत्या आणि तो वेळ वाया न घालवता सत्कारणी लावत असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. काजोल आता वयाच्या पन्नाशीत असली तरी तिच्या सौंदर्यात फारसा फरक पडलेला नाही. मात्र गेल्या काही वर्षात ती चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूर गेली असून आपल्या संसारात रमल्याचे पाहायला मिळते. हेअर, मेकअप, लाफ्टर अँड हॉबी. उत्तम मल्टीटास्किंग असेही पुढे तिने म्हटले आहे. अवघ्या २ तासात १ लाखांहून अधिक जणांनी तिचा हा व्हिडिओ लाईक केला आहे. 


Web Title: Actress Kajol Waving Wool While Doing Makeup Viral Video : Kajol preserves her passion while doing makeup; Watch the exclusive video she shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.