Join us

प्रिती झिंटाच्या लाडक्या लेकाने आजीसोबत लाटल्या पोळ्या, फोटो शेअर करत म्हणाली, ही तर आयुष्यातली....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 12:33 IST

Viral Post Of Actress Preity Zinta: अभिनेत्री प्रिती झिंटा हिने तिच्या आईविषयी आणि मुलगा जय याच्याविषयीची एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून ती सध्या बरीच व्हायरल झाली आहे...(Actress Preity Zinta's 3 years old son jai help his nani for making roti)

ठळक मुद्देमुलांच्या भातुकलीच्या खेळातल्या अशा लहान लहान गोष्टी अनुभवणं, त्यांचा आस्वाद घेणं किती सुखद असतं, हा ते अनुभव घेतलेलेच जाणू शकतात.. 

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या बाॅलीवूड, चित्रपट या सगळ्यांपासून बरीच दूर आहे. खूप दिवस झाले ती कोणत्याच चित्रपटातही दिसलेली नाही. सध्या ती परदेशात स्थायिक झाली असून नवरा आणि मुलं यांच्यामध्ये रमून गेली आहे. सोशल मिडियावर मात्र ती बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते आणि त्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशीही कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते. हल्ली गार्डनिंग तिचा छंद झाला असून तिने गार्डनमध्ये कशाप्रकारे भाज्या, फळं लावलेली आहेत, याचे व्हिडिओही ती शेअर करत असते. पण आता नुकतीच तिने जी पोस्ट शेअर केली आहे, ती सगळ्यांपेक्षा खूप वेगळी असून यामध्ये तिचा मुलगा जय त्याच्या आजीसोबत म्हणजेच प्रितीच्या आईसोबत स्वयंपाक घरात पोळ्या करताना दिसतो आहे (Actress Preity Zinta's 3 years old son jai help his nani for making roti)....

 

टिपिकल भारतीय घरांमध्ये दिसून येणारं हे चित्र आहे. अनेक पिढ्या न पिढ्या ज्या गोष्टी करत पुढे आल्या आहेत किंवा येत आहेत, तेच चित्र प्रितीच्या परदेशातल्या घरात यानिमित्ताने दिसून आलं. जवळपास सगळ्याच महिलांना हा अनुभव येतोच की स्वयंपाक करत असताना त्यांची मुलं खूप मध्येमध्ये करतात.

२०२४ मध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या किचन टिप्स! सांगा तुम्हाला यापैकी किती माहिती आहेत

त्यामुळे मग मुलांचं मन रमविण्यासाठी किंवा कधी त्यांना काही नव्या गोष्टींचा अनुभव देण्यासाठी आई- आजी स्वयंपाक घरातलं काम करताना मुलांना सोबत घेतात. त्या मुलांसाठी भातुकलीच्या खेळातलं पोळपाट- लाटणं आणलं जातं. त्या छोट्याशा पोळपाट लाटण्यावर मुलांनी केलेल्या इवल्याशा पोळ्या मग मोठ्या प्रेमाणे खाल्ल्याही जातात. तसंच काहीसं प्रितीच्या लेकाने केलं. 

 

प्रितीने जो फोटो शेअर केला आहे त्यात प्रितीची आई पोळ्या करताना दिसत आहे. तर तिच्या मुलाच्या हातात लाटणं आहे. यावरूनच जयने त्याच्या आजीला पोळ्या करण्यासाठी मदत केली आहे, असं दिसून येतं.

५ रुपयांची तुरटी चेहऱ्यावर करेल कमाल! पिंपल्स, ॲक्ने जाऊन काही दिवसांतच त्वचा होईल स्वच्छ- सुंदर

आजी आणि नातवाच्या त्या सुंदर फोटोला कॅप्शन देताना प्रिती म्हणते की आई आणि माझा छोटा शेफ जय यांनी केलेली ही पोळी खाणं म्हणजे आयुष्यातली एक खूप खास गोष्ट आहे.. खरंच तर म्हणते आहे प्रिती.. मुलांच्या भातुकलीच्या खेळातल्या अशा लहान लहान गोष्टी अनुभवणं, त्यांचा आस्वाद घेणं किती सुखद असतं, हा ते अनुभव घेतलेलेच जाणू शकतात.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलप्रीती झिंटाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पालकत्व