बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून राधिका आपटे ओळखली जाते. तिच्या बिंधास्तपणाची, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची नेहमीच चर्चा असते. आता अशीच एक चर्चा सोशल मिडीयावर तिच्या बाबतीत रंगली आहे. काही आठवड्यांपुर्वीच राधिकाने बाळाला जन्म दिला. आता तिचा एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून यामध्ये ती एकीकडे बाळाला फिडींग (breast feeding) देते आहे तर दुसरीकडे लॅपटॉपवर काहीतरी काम करते आहे. खरं पाहायला गेलं तर त्या फोटोची एवढी चर्चा होण्याचं आणि त्यावर एवढी मतमतांतरं येण्याचं काहीच कारण नाही. पण फोटोला जे काही कॅप्शन देण्यात आलं आहे, त्यावरून अनेक वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे.(Actress Radhika Apte Shared First Picture Of Her Baby)
viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून त्याच्या कॅप्शनमध्ये राधिकाला ट्रेण्डसेटर म्हणण्यात आलं आहे. राधिका एकीकडे काम करते आहे, दुसरीकडे बाळालाही फिडींग देते आहे. हे सगळं कौतूकास्पद नक्कीच आहे.
कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल
पण ती असं करते आहे म्हणून ती काही ट्रेण्डसेटर नाही. कारण अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला किंवा आपल्या घरातच पाहात असतो. अभिनेत्रींच्या बाबतीतच बोलायचं झालं तर सोनम कपूर, आलिया भट या देखील या सगळ्यांतूनच पुढे गेल्या आहेत.
या फोटोला खूप बोलक्या कमेंट आल्या आहेत. काही जण म्हणतात की एक आई आणि करिअर वुमन म्हणून ती जे काय करते आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. पण आपल्या आईने, आजीने हेच केलं आहे. करिअर केलं नसलं तरी मुलं सांभाळत घरातली कामं केलीच आहे.
मेथीची भाजी नेहमीच कशाला शिजवून खायची? एकदा कच्च्या मेथीचा घोळाणा खाऊन पाहा, घ्या रेसिपी
अगदी आजची पिढीसुद्धा याच दिव्यातून पुढे जात आहे. त्यामुळे जे आजवर आपल्याकडे होत आलं आहे, तेच राधिकासुद्धा करते आहे. तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणता विचार तुम्हाला जास्त पटताे? राधिका ट्रेण्डसेटर वाटते की तुमच्याआमच्यासारखीच मुलांना सांभाळून इतर कामं बघणारी एक सक्षम स्त्री वाटते?