Lokmat Sakhi >Social Viral > उर्फी जावेदने घातलेल्या 20 किलोच्या काचेच्या ड्रेसची चर्चा, काचेच्या तुकड्यांपासून कसा बनवला असेल तो ड्रेस?

उर्फी जावेदने घातलेल्या 20 किलोच्या काचेच्या ड्रेसची चर्चा, काचेच्या तुकड्यांपासून कसा बनवला असेल तो ड्रेस?

Urfi Javed'S Glass Dress: तब्बल २० किलोचा ड्रेस, आणि तो ही काचेचा.. तुम्ही पाहिलं का उर्फी जावेदला तिच्या या विचित्र ड्रेसमध्ये? (dress of 20 kg)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 06:04 PM2022-05-23T18:04:22+5:302022-05-23T18:13:50+5:30

Urfi Javed'S Glass Dress: तब्बल २० किलोचा ड्रेस, आणि तो ही काचेचा.. तुम्ही पाहिलं का उर्फी जावेदला तिच्या या विचित्र ड्रेसमध्ये? (dress of 20 kg)

Actress Urfi Javed wore 20 kg transparent dress made up of glass pieces | उर्फी जावेदने घातलेल्या 20 किलोच्या काचेच्या ड्रेसची चर्चा, काचेच्या तुकड्यांपासून कसा बनवला असेल तो ड्रेस?

उर्फी जावेदने घातलेल्या 20 किलोच्या काचेच्या ड्रेसची चर्चा, काचेच्या तुकड्यांपासून कसा बनवला असेल तो ड्रेस?

Highlightsउर्फीने यावेळी जो ड्रेस घातला आहे, तो चक्क काचेच्या तुकड्यांपासून तयार करण्यात आला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदचे किस्से आणि तिचा ड्रेसिंग सेन्स हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. कधी ती तिच्या अंगावर फुलं लावून घेते तर कधी खूपच चित्रविचित्र ड्रेस घालून ट्रोलर्ससाठी वेगवेगळे विषय देऊन मोकळे होती... त्यामुळे सोशल मिडियावर (viral post of Urfi Javed) ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असते. तिचा बिंधास्त ॲटीट्यूडही अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. आता सध्या पुन्हा एकदा ती जबरदस्त चर्चेत आली आहे. आणि यावेळी तिच्या चर्चेचे कारण आहे, तो तिचा ड्रेस...

 

कारण यावेळचा तिचा ड्रेस खरोखरंच आपल्या कल्पनेबाहेरचा आहे.. प्लॅस्टिकच्या रॅपर्सपासून तयार केलेले ड्रेस, झाडाच्या पानांपासून बनवलेले ड्रेस, अगदी डस्टबिन बॅगपासून बनविलेले ड्रेसही आपण ऐकलेले आहेत... पण उर्फीने यावेळी जो ड्रेस घातला आहे, तो चक्क काचेच्या तुकड्यांपासून तयार करण्यात आला आहे. काचेचे तुकडे एकमेकांना जोडून तयार झालेल्या या ड्रेसचे वजन तब्बल २० किलो (20 kg) एवढे आहे. काचेचा एवढासा तुकडा हातात घेतानाही आपण १० वेळा विचार करतो, आणि इथे तर या बाई चक्क काचेच्या तुकड्यांचा ड्रेस अंगावर घालून मिरवत आहेत. त्यामुळेच तर तिच्या या ड्रेसिंग स्टाईलकडे पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत. 

 

या ड्रेसच्या निमित्ताने उर्फीची चर्चा तर आहेच, पण तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिचा हा ड्रेस पुर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे एका पांढऱ्या ड्रेसवर तिने हा ड्रेस घातला आहे.. ड्रेस तु अंगावर घातला खरा, पण आता खाली बसणार कशी? हा प्रश्न तिला चाहत्यांकडून विचारला जात आहे. तिचा या ड्रेसवरचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला आहे. या ड्रेसचे डिझायनर कोण हे मात्र समजले नाही. माझा ड्रेस पाहून लोक मला विअर्ड, क्रेझी म्हणत आहेत, पण या ड्रेसमध्ये मी fabulous दिसते आहे, असं मला वाटतं, असंही ती म्हणते. 

 

Web Title: Actress Urfi Javed wore 20 kg transparent dress made up of glass pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.