आपलं घर स्वच्छ-साफ दिसावं असं प्रत्येकालाच वाटत. घर स्वच्छ साफ असेल तर आजारांपासून लांब राहता येतं. फरशी चांगली राहण्यासाठी लादी पुसताना काही ट्रिक्स वापरल्या तर घर स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि दुर्गंधही येणार नाही. (5 Things You Can Put In Mop Water For Fresh Smelling) याशिवाय डास-किटक दूर राहण्यास मदत होईल. (Add This Liquid In Mop Water For Clean Floor)
लादी पुसतााना २ झाकण लिक्विड पाण्यात घाला ज्यामुळे किडे, डास, निगेटिव्हीटी, बॅक्टेरिया दूर होतील आणि घरात चांगला सुंगध दरवळेल. हे लिक्विड घरात बनवणं खूपच सोपं आहे. (Add This Liquid In Mop Water For Clean Floor Add One Capful Of This Solution To The Mop Water)
लादी पुसताना लिक्विड तयार करण्यासाठी एक नॅप्थलीन बॉल्स घ्या, मीठी, कडुलिंबाची पानं आणि कापूर या साहित्याची आवश्यकता असेल. सगळ्यात आधी नॅप्थलीन बॉल्स, मीठ आणि कापूर वाटून पावडर बनवून घ्या. कडुलिंबाची पानं पाणी गरम करून त्यात घाला. त्यानंतर गाळून एका बॉटलमध्ये भरा. लादी पुसताना या लिक्विडचा वापर करा.
मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ
जेव्हा तुम्ही लादी पुसाल तेव्हा २ झाकण हे लिक्वीड पाण्यात मिसळा. त्यानंतर फरशी चमकू लागेल. यातील नॅप्शलीनमुळे किटक दूर होण्यास मदत होईल. मीठामुळे निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होईल. यातील कापूर बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करतो. २ झाकण फरशीच्या पाण्यात मिसळून तुम्ही आजारांपासून लांब राहू शकता. ज्यामुळे घर चमकदार दिसेल.
१) डिशवॉशर सोप
डिशवॉशर सोपच्या मदतीने तुम्ही फरशी स्वच्छ करू शकता. पाण्यात थोडं सोपचं पाणी मिसळून व्यवस्थित मिश्रण तयार करा. यामुळे फरशी चमकदार दिसू लागेल. लिक्वीड सोप आणि व्हिनेगर वापरून तुम्ही फरशीचा चिकटपणा दूर करू शकता. एक बादली पाण्यात लिक्विड सोप घेऊन त्यात मिश्रण मिसळा. टाईल्स, ब्रिक, लाकडाच्या फरशीवर व्यवस्थित पुसून घ्या.
कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी
२) बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याने तुम्ही डाग सहज स्वच्छ करू शकता. ज्यामुळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होईल. बेकिंग सोडा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. जेव्हाही तुम्ही लादी पुसता तेव्हा बेकींग सोड्यात पाणी मिसळून व्यवस्थित पाणी मिसळून लादी पुसून घ्या.