Lokmat Sakhi >Social Viral > केमिकल वापरुन लादी स्वच्छ पुसली तरी चिलटं-झुरळं-माशा येतातच घरात? करा ३ उपाय...

केमिकल वापरुन लादी स्वच्छ पुसली तरी चिलटं-झुरळं-माशा येतातच घरात? करा ३ उपाय...

Adding This Things In Mopping Water : Adding This Things In Mopping Water Will Prevent Ants Cockroaches And Other Insects : महागडे फिनाईल, क्लिनर्स वापरुन देखील घरातील चिलटं-झुरळ जात नसतील तर लादी पुसताना करावेत असे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 08:07 AM2024-10-02T08:07:20+5:302024-10-02T08:19:08+5:30

Adding This Things In Mopping Water : Adding This Things In Mopping Water Will Prevent Ants Cockroaches And Other Insects : महागडे फिनाईल, क्लिनर्स वापरुन देखील घरातील चिलटं-झुरळ जात नसतील तर लादी पुसताना करावेत असे उपाय...

Adding This Things In Mopping Water Will Prevent Ants Cockroaches And Other Insects | केमिकल वापरुन लादी स्वच्छ पुसली तरी चिलटं-झुरळं-माशा येतातच घरात? करा ३ उपाय...

केमिकल वापरुन लादी स्वच्छ पुसली तरी चिलटं-झुरळं-माशा येतातच घरात? करा ३ उपाय...

घरातील फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण ती दिवसभरातून किमान दोन वेळा तरी पुसतो. काहीवेळा बाहेरच्या खराब वातावरणामुळे किंवा पाऊस जास्त पडल्यास घरात चिलटं, डास,माशा, झुरळी येतात. असे किटक काहीवेळा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात जाऊन राहतात. हे किटक घरात असले की फार त्रास देतात. घराच्या कोपऱ्यात लपलेले हे किटक किचनमधील अन्नावर येऊन बसतात. हे लहान लहान किटक अन्नाच्या संपर्कात आल्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. घर कितीही काळजीपूर्वक स्वच्छ केले तरी हे किटक कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातून येतातच(Adding This Things In Mopping Water).

घरात जर किटकांचा असा वावर असेल तर घरातील व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येते. अशावेळी आपण घर शक्य तितके स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घर स्वच्छ ठेवण्यासाठी सगळ्यात आधी फरशी (Cleaning Hacks & Tips) पुसली जाते. फरशी पुसताना आपण पाण्यांत वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनर्स, फिनाईल घालतो. यामुळे फरशी तर स्वच्छ होते पण घराच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेले किटक तसेच राहतात. आपल्याला जर घराच्या कोपऱ्यातील चिलटं, डास,माशा, झुरळी कायमची घराबाहेर घालवायची असतील तर आपण तीन सोप्या उपायांचा वापर करु शकतो. लादी पुसताना पाण्यांत या तीन गोष्टी मिसळल्याने घरातील चिलटं, डास,माशा, झुरळी गायब होऊन आपले घर स्वच्छ होते(Adding This Things In Mopping Water Will Prevent Ants Cockroaches And Other Insects).

लादी पुसताना पाण्यांत मिसळा हे तीन पदार्थ... 

१. तमालपत्र :- चिलटं, डास,माशा, झुरळी यांना तमालपत्राचा उग्र वास आवडत नाही. त्यामुळे घरातील लादी पुसताना तमालपत्र वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तमालपत्रात पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून ती एका डब्यात ठेवावी. जेव्हा तुम्ही लादी पुसाल तेव्हा फक्त एक चमचा तमालपत्राची पेस्ट पाण्यात मिसळा. या पाण्याने लादी पुसल्याने घरातील चिलटं, डास,माशा, झुरळी प्रमाण कमी होते.

शाळेच्या युनिफॉर्मवर रोज शाईचे डाग? मुलांना ओरडण्यापेक्षा करा २ सोप्या टिप्स, युनिफॉर्म दिसेल नव्यासारखा... 

२. कारल्याच्या सालीची पेस्ट :- जेव्हा तुम्ही घरात कारल्याची भाजी कराल तेव्हा या कारल्याच्या साली स्टोअर करून ठेवा. या कारल्याच्या साली मिक्सरमध्ये वाटून त्यांची पातळसर पेस्ट करुन घ्या. आता लादी पुसताना पाण्यात ही कारल्याची पेस्ट मिसळा. या पाण्याने लादी पुसल्यास लादी स्वच्छ होऊन घराच्या कानाकोपऱ्यात लपलेले किटक गायब होतात. 

सुईत धागा ओवायचा तर चटकन जमत नाही? ५ ट्रिक्स, एका सेकंदात काम करा फत्ते...

३. लवंगाची पेस्ट :- लादी पुसण्यासाठी लवंगाची पेस्ट तयार करण्याकरिता मूठभर लवंग घ्याव्यात. आता या सगळ्या लवंग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.  आता ही पावडर एक ग्लास पाण्यात टाकून चांगली उकळवून घ्यावी. आता हे उकळलेले लवंगाचे पाणी एका बाटलीत भरुन स्टोअर करुन ठेवावे. जेव्हा आपण लादी पुसण्यासाठी पाणी घेतो तेव्हा या पाण्यांत थोडे लवंगाचे पाणी घालून मिक्स करुन घ्यावे. या पाण्याने लादी पुसावी यामुळे घरातील किटक नाहीसे होण्यास मदत मिळते.

Web Title: Adding This Things In Mopping Water Will Prevent Ants Cockroaches And Other Insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.