वडील मुलीच्या नात्यातील प्रेमाची तुलना कशाबरोबरही केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियावर अलिकडेच एक मन जिंकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा दिवस आनंदात जाईल. लहान मुलं सहजासहजी झोपायला मागत नाही. अनेकांना अंगाई गायल्याशिवाय झोपच येत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वडील आपल्या चिमुकलीसाठी अंगाई गाताना दिसत आहेत. (Adorable video father sings a lullaby to his son as he sleeps on the guitar)
व्हिडिओमध्ये एक बाप आपल्या लहान मुलीला गिटारवर झोपवून ट्यून वाजवून स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जात आहे. व्हिडिओमध्ये लहान मूलही शांत झोपेत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान, वडिलांच्या तोंडून गोड अंगाई ऐकताना मूल देखील हळू हळू काहीतरी गुणगुणत आहे.
ना पीठ मळायची कटकट, ना लाटायची झंझट; 'या' सोप्या पद्धतीनं करा पौष्टीक, खमंग पराठे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ @ValaAfshar नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजर्स या व्हिडिओ पसंती देत आहेत. आतापर्यत या व्हिडिओला ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर १ हजारापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या रिएक्शन्स देत आहेत.