Join us  

तांदुळावर प्लास्टिक कोटिंग तर नाही? बघा तांदळातली भेसळ ओळखण्याच्या ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 9:52 AM

How to Check The Purity of Chawal: सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. म्हणूनच घरी येणारा प्रत्येक पदार्थ शुद्ध की भेसळीचा (adulteration) हे ओळखता आलं पाहिजे.

ठळक मुद्देआपण आणलेला महागडा तांदूळही तसाच नाही ना, हे तपासण्यासाठी या काही गोष्टी करून बघा. 

हल्ली प्रत्येक खाद्यपदार्थांमध्येच भेसळीचं प्रमाण एवढं जास्त वाढलं आहे की कोणत्या पदार्थात कशाची भेसळ केलेली असणार, हे काही सांगताच येत नाही. दूध, दही, पनीर, खवा, तिखट, पेढा या सगळ्या पदार्थांमध्ये तर सणाच्या दिवसांत भेसळ (food adulteration in festive season) केल्याच्या अनेक घटना दरवर्षीच उघडकीस येतात. आता तांदुळातही भेसळ केली जात असल्याच्या किंवा त्याला कृत्रिम सुगंध लावण्यात येत असल्याच्या किंवा तांदुळ चमकदार दिसावा म्हणून त्यावर प्लास्टिक कोटिंग करण्यात आल्याच्या अनेक बातम्या आपण बघतो. आपण आणलेला महागडा तांदूळही तसाच नाही ना, हे तपासण्यासाठी या काही गोष्टी करून बघा. 

 

तांदळामधील भेसळ ओळखण्यासाठी....१. तांदूळ जाळून बघातांदूळ चमकदार दिसण्यासाठी त्यावर प्लास्टिक कोटिंग करण्यात येतं. आपला तांदूळ तसा आहे का हे तपासण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्या आणि ते जाळून बघा.

आतापासूनच रोज वापरा घरगुती अलमंड नाईट क्रिम; दिवाळीला फेशियल करायची गरजच पडणार नाही, त्वचा होईल चमकदार

जाळल्यानंतर जर तांदळातून प्लास्टिकसारखा वास आला तर त्यावर प्लास्टिक कोटिंग आहे, हे ओळखावे.  

 

२. चुन्याचा वापरएका वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्या. त्यात चुन्याचं पानी टाका. एखादा तास तांदूळ त्याच पाण्यात भिजू द्या. तासाभरानंतर जर तांदळाचा रंग बदलला तर त्यात भेसळ आहे, हे समजून घ्या. 

 

३. पाण्याचा वापरएक चमचा तांदूळ एक ग्लास पाण्यात टाका. तांदूळ पाण्यात बुडाले आणि ग्लासच्या तळाशी जमा झाले तर त्यात भेसळ नाही.

गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच..

पण तांदूळ जर बऱ्याच वेळानंतरही पाण्यावर तरंगत राहिले तर त्यावर प्लास्टिक कोटिंग असण्याची शक्यता असते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न