अफगाणिस्तानमध्येतालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यावर महिलांवरील अत्याचारांच्या जुन्या कहाण्याही पुन्हा समोर येत आहेत. अफगाणिस्तानमधील चित्रपट निर्मात्या सहरा करीमी यांनी सोशल मीडियावर तालिबान्यांच्या अत्याचाराबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. ''मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा देश सोडणार नाही,'' असे अफगाणिस्तानचे चित्रपट निर्मात्या सहरा करीमी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अश्रू पुसताना सांगितले. अफगाणिस्तानच्या प्रमुख महिला चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या सहरा करीमी यांनी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीत प्रवेश केल्यावर काबुलमध्ये काय घडलं याचा एक व्हिडिओ शेअर केला.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करीमी काबुलच्या रस्त्यावरांवर तालिबान्यांनी हल्ला केला असताना धावताना दिसून येत आहेत. "ही भितीदायक चित्रपटाची क्लिप नाही, हे काबूलमधील वास्तव आहे. मागच्या आठवड्यात या शहराने एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आणि आता ते त्यांचा जीव वाचवण्यसाठी पळून जात आहेत. हे खूपच हृदयद्रावक आहे, पण जग काहीच करत नाही," असं कॅप्शन देत इराणी पत्रकार मसीह अलिनेजाद यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.
निर्मात्याने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या संदेशासह ऑनलाइन व्हायरल झाला आणि जगातील सर्व चित्रपट समुदायांना पाठिंब्याचे आवाहन केले. सहरा करीमी ही अफगाण चित्रपटाच्या महासंचालकपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी सांगितले की, ''माझा देश सोडण्याचा विचार अजिबात नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा देश सोडणार नाही," त्यांनी अश्रू पुसून ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपलं मत मांडलं.
त्यांनी सांगितले की, ''मी बँकेत पैसे घेण्यासाठी गेली होती, पण बँक बंद होती आणि रिकाम्या हाती मला परतावं लागलं. मला अजूनही विश्वास बसत नाही की हे असं कसं घडलं आणि कोणामुळे घडलं. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हाला पुन्हा बोलावतेय मोठ्या जगातील लोकांनो गप्प बसू नका. ते आम्हाला मारण्यासाठी येत आहेत.'' असे त्यांनी ट्विटरवर लिहिले.
बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने सहरा करीमीचे आवाहन सोशल मीडियावर शेअर केले आहे. अनुरागने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर जाऊन चित्रपट निर्मात्यांचे एक खुले पत्र शेअर केले. त्यात त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल भाष्य केले आहे आणि सर्वांना हा संदेश व्यापकपणे पसरवण्याचे आवाहन केले होते. त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुरागने लिहिले, "कृपया हे दूरदूरपर्यंत शेअर करा ..."
करीमीने त्यांच्या पत्राची सुरुवात केली की, "मी तुटलेल्या हृदयासह लिहिते आणि माझ्या सुंदर लोकांना, विशेषत: चित्रपट निर्मात्यांना तालिबानपासून वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर सामील व्हाल असे आवाहन करते. गेल्या काही आठवड्यांत तालिबानने अनेक प्रांतांवर नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी आमच्या लोकांची हत्या केली, त्यांनी अनेक मुलांचे अपहरण केले, त्यांनी मुलींना बालवधू म्हणून विकले. त्यांनी पोशाखासाठी एका महिलेची हत्या केली ... "करीमी यांनी पुढे लिहिले, "माध्यमे, सरकारे आणि जागतिक मानवतावादी संस्था सोयीस्करपणे गप्प आहेत जसे की
तालिबानशी हा 'शांतता करार' कधीही वैध होता, कधी वैध नव्हता. हेच त्यांनी ओळखल्याने त्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास मिळाला. तालिबान आमच्या लोकांवर अत्याचार करत आहे. माझ्या देशात एक चित्रपट निर्माता म्हणून मी जे खूप कष्ट केले ते सर्व कोसळण्याचा धोका आहे. कृपया अफगाणिस्तान परत मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वी कृपया आम्हाला मदत करा. आमच्याकडे थोडा वेळ आहे, कदाचित दिवस आहेत," या वाक्यानं करीमी यांनी पत्राचा शेवट केला.