Join us  

Social Viral : आई बनण्यासाठी स्वतःचं अस्तित्व विसरावंच लागतं? Fashion Blogger महिलांना सांगतेय की...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 1:59 PM

Social Viral : बायकांनी मेकअप करण्यात वेळ घालवू नये, फक्त मुलांसाठी पैसे वाचवून ठेवावेत. असे विचार चुकीचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आई होण्याचा अनुभव हा खूप खास असतो. बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. आपल्या करिअरसह इतर गोष्टींबाबत तडजोड करावी लागते. जबाबदाऱ्या वाढतात आणि कुठेतरी वैयक्तिक आयुष्याचं महत्व कमी होऊ लागतं. फॅशन ब्लॉगर आणि YouTuber रोशनी भाटिया (Fashion Blogger and YouTuber Roshni Bhatia) यांनी आपल्या शैलीत याबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

रोशनी भाटियाने @thechiquefactor सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपले विचार महिलांपर्यंत पोहोचवले आहेत. तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये त्यांनी सुंदर ड्रेस घालून साजेसा मेकअप केला आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला त्यांनी एक छानसं वाक्य लिहिलं आहे. मेक-अप आणि बॅकलेस ड्रेस घालून त्या सर्कास्टिकल लोकांना सांगतांत की, मातृत्व म्हणजे एखाद्या पिंजऱ्यात कैद होणं नाही.

आतापर्यंत ४४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.  त्यांच्यामते बाळाला जन्म दिल्यानंतर पारंपारिक कपडे घालून, कुटुंबाला महत्व द्यावं, महिलांनी बाहेरची कामं केली नाहीत तरी चालतील असा विचार करणं चुकीचं आहे.

महिलांना आवडीच्यागोष्टी विकत घेण्याची गरज नसते, बायकांनी मेकअप करण्यात वेळ घालवू नये, फक्त मुलांसाठी पैसे वाचवून ठेवावेत. असे विचार चुकीचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रोशनी यांनी दुसरं लग्न केलं आणि संसाराला सुरूवात केली. पहिल्या लग्नात त्यांना अनेक बंधनातून जगावं लागत होतं. मोकळंपणानं आपलं आयुष्य जगता येत नव्हतं.

आता त्यांना एक मुलगा आहे त्यालाच त्या आपला चांगला मित्र मानतात. त्यांच्यामते आई होण्याचा अर्थ महिलांनी स्वप्नं पाहणं सोडून द्यावीत असा नाही. काम कोणतं करायचं, कसं करायचं याची निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलमहिला