अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याच्याशी लग्न करून अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) एका पंजाबी कुटूंबाची सून झाली. आता अस्सल पंजाबी कुटूंब (punjabi family) म्हणजे तिथे खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते. दूध, तूप, दही, लस्सी आणि "घी वाले पराठे" हा तर पंजाबी कुटूंबांचा रोजचा मेन्यू.. त्याशिवाय त्यांचं पानच हलत नाही. विकी कौशलच्या कुटूंबाचं वातावरणही असंच. त्यात त्याच्या आईला सगळ्यांना खाऊ- पिऊ घालण्याची भारीच हौस. आता कतरिना म्हणजे तर त्यांची लाडाची सून. तिला तर भरभरून आग्रह होणारच. मग सासुबाईंचं ऐकून पराठे खायचे की आपलं डाएट सांभाळायचं, अशा धर्मसंकटात ती बिचारी रोजच अडकायची.
आपल्या कुटूंबातला हा गमतीदार किस्सा कतरिनाने नुकताच कपिल शर्मा शो मध्ये सांगितला आणि एकच हशा पिकला. एखादी मुलगी जेव्हा नवी नवरी म्हणून तिच्या सासरी जाते, तेव्हा सुरुवातीच्या दिवसांत तिला अशा अनेक प्रसंगांना नेहमीच तोंड द्यावे लागते.
दिवाळीचा फराळ उरलाय? फराळ जास्त दिवस उत्तम राहण्यासाठी ३ उपाय, खराब होण्याची भीती नाही..
सासरकडच्या मंडळींच्या आग्रहाखातर स्वत:ला आवडत नसताना, पटत नसतानाही अनेक गोष्टी कराव्या लागतात. तसंच काहीसं कतरिनाचं झालं. कपिलने तिला विचारलं की पंजाबी कुटूंबात लग्न करून गेल्यावर तुझ्या डाएट प्लॅनमध्ये काही फरक पडला का?
त्यावर कतरिना म्हणाली की हो, सुरुवातीच्या काही दिवसांत खूपच फरक जाणवला. कौशल कुटूंबात सकाळच्या नाश्त्याला नेहमीच पराठे केले जातात आणि त्यावर भरपूर तूप असतं.
दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?
सासुबाई ते पराठे खाण्याचा खूपच आग्रह करायच्या. पण माझ्या डाएट प्लॅननुसार मात्र मी असं काहीच खाऊ शकत नाही. पण त्यांचं मन राखण्यासाठी मग मी त्याच्यातला एकच घास घ्यायचे. पण हळूहळू त्यांनाही माझी होणारी पंचाईत लक्षात आली आणि त्यांनी आग्रह करणं सोडून दिलं. आता त्या माझ्यासाठी माझ्या डाएटला चालेल अशी रताळ्याची एक रेसिपी करून देतात. ती मात्र मी अगदी आनंदाने खाते..