Lokmat Sakhi >Social Viral > Lara Dutta and Mahesh Bhupati: 'नवरा कधीच आपला धड फोटो काढत नाही!' - असं लारा दत्तालाही वाटतंच, ती म्हणते..

Lara Dutta and Mahesh Bhupati: 'नवरा कधीच आपला धड फोटो काढत नाही!' - असं लारा दत्तालाही वाटतंच, ती म्हणते..

Lara Dutta and Mahesh Bhupati: नवऱ्याच्या फोटोग्राफीबाबत जगातल्या बहुतांश बायका असाच विचार करत असतात....  जो विचार सध्या लारा दत्ता तिच्या नवऱ्याबाबत करते आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 03:07 PM2021-12-24T15:07:32+5:302021-12-24T15:10:28+5:30

Lara Dutta and Mahesh Bhupati: नवऱ्याच्या फोटोग्राफीबाबत जगातल्या बहुतांश बायका असाच विचार करत असतात....  जो विचार सध्या लारा दत्ता तिच्या नवऱ्याबाबत करते आहे..

After over a decade of marriage my husband has finally learnt to take a good photo of me, said actress Lara Dutta | Lara Dutta and Mahesh Bhupati: 'नवरा कधीच आपला धड फोटो काढत नाही!' - असं लारा दत्तालाही वाटतंच, ती म्हणते..

Lara Dutta and Mahesh Bhupati: 'नवरा कधीच आपला धड फोटो काढत नाही!' - असं लारा दत्तालाही वाटतंच, ती म्हणते..

Highlightsअनेक जणींची गोष्ट तर याच्याही पुढची असते. त्यांना असं वाटत असतं की नवऱ्याला फक्त आपले फोटो काढायला सांगितले तरच त्याचं असं होतं...

मिस युनिव्हर्स तसेच बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता आणि तिचा नवरा प्रसिद्ध टेनिसपटू महेश भुपती यांनी त्यांची ॲनिव्हर्सरी (anniversary of Lara Dutta and Mahesh Bhupati) नुकतीच मालदिव येथे साजरी केली. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून आल्यानंतर लाराने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लारा खरोखरंच खूप स्टनिंग आणि हॉट दिसत असून तिचे हे फोटो कोणत्याही फोटोग्राफरने नाही, तर तिचा नवरा दस्तुरखुद्द महेश भुपती याने काढले आहेत. या फोटोंना लाराने (pictures of Lara Dutta) अतिशय भारी कॅप्शन दिली असून नवऱ्याच्या फोटोग्राफीवर विश्वास नसणाऱ्या कोणत्याही स्त्री ला लाराला (photos of Lara Dutta ) नेमकं काय म्हणायचं आहे, याचा बरोबर अंदाज येईल..

 

लाराने फोटो शेअर करताना असं म्हटलं आहे की, After over a decade of marriage my husband has FINALLY learnt to take a good photo of me!!! ... आता सांगा तुम्हालाही तुमच्या नवऱ्याच्या फोटोग्राफीबाबत असंच वाटतं की नाही??? लारा म्हणते आहे की फायनली लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी माझ्या नवऱ्याला माझा जरा तरी चांगला म्हणता येईल असा फोटो काढता आला आहे... लाराचे हे बोल ऐकून अनेक जणींना स्वत:चे नवऱ्याने काढलेले अनेक फोटो नक्कीच आठवून गेले असणार...

 

फक्त लाराच नाही, तर अनेक मैत्रिणींची हीच कहाणी आहे.. कुठल्याही कार्यक्रमासाठी आपण छान तयार झालो की स्वत:चा एक तरी फोटो काढावाच असं बहुतांश मैत्रिणींना हमखास वाटतं... आसपास कुणीच नसलं तर नाईलाजाने मोबाईल नवऱ्याजवळ दिला जातो आणि फोटो काढायला सांगितला जातो. कारण आपला नवरा आपले कसे फोटो काढणार याची आपल्याला पुर्ण कल्पना असतेच असते... होतं ही अगदी तसंच...

 

बायकोने फोटो काढण्यासाठी हातात मोबाईल देताच नवऱ्याचं तोंड वाकडं होतं, तो पार वैतागून जातो आणि मग तेच प्रतिबिंब आपल्या फोटोतही पडतं.. आपण इतकं छान तयार झालो तरी नवऱ्याने काढलेला आपला एकही फोटो धड येत नाही म्हणून मग धुसफुस सुरू होते... असा फोटो काढ, तसा फोन पकड... अशा भरपूर सूचना देऊनही नवऱ्याकडून काही आपले आपल्या मनासारखे फोटो निघत नाहीत.. मग प्रचंड चिडचिड होते आणि नवऱ्याच्या फोटोग्राफी ज्ञानाबाबत भरपूर तोंडसुख घेतलं जातं..

 

अनेक जणींची गोष्ट तर याच्याही पुढची असते. त्यांना असं वाटत असतं की नवऱ्याला फक्त आपले फोटो काढायला सांगितले तरच त्याचं असं होतं... आपण सोडून इतर सर्वांचे, दुसऱ्या बायकांचे फोटोही तो चांगले काढतो... तुम्हालाही असंच वाटतं का? लारा दत्ताचं म्हणणं तुम्हाला कितपत पटतं आहे?? 

 

Web Title: After over a decade of marriage my husband has finally learnt to take a good photo of me, said actress Lara Dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.